संतप्त जमावाने ड्रग्स तस्कर तरूणाचे हात,पाय कापले
By admin | Published: June 10, 2017 06:14 AM2017-06-10T06:14:21+5:302017-06-10T06:22:08+5:30
पंजाबच्या भटिंडामध्ये अंमली पदार्थाची विक्री करणा-या तरूणाचे हात आणि पाय कापल्याची घटना घडली आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
भटिंडा, दि.10 -पंजाबच्या भटिंडामध्ये अंमली पदार्थाची विक्री करणा-या तरूणाचे हात आणि पाय कापल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. रूग्णालयात दाखल केल्यानंतर या तरूणाचा मृत्यू झाला. विनोद कुमार (वय-25) असं मृत तरूणाचं नाव आहे.
विनोद कुमार हा त्याच्या गावी आला असताना जमावाने त्याच्यावर हल्ला केला. जमावातील काही जणांनी हे भयावह दृष्य आपल्या मोबाइल कॅमे-यामध्येही शूट केलं आहे.
विनोद कुमारला अंमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी अटक झाली होती आणि तीन ते चार दिवसांपूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक जगदिश कुमार यांनी दिली. येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात तक्रारी करुनही पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने गावातील जमाव आक्रमक झाला होता. त्यामुळेच लोकांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विनोद कुमारला जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता प्रक्षुब्ध जमावाने त्याचे हात आणि पाय कापले. त्यानंतर पोलिसांनी जमावाच्या तावडीतून विनोदची सुटका केली आणि त्याला फरीदकोटमधील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
पंजाबमध्ये अंमली पदार्थ ही मोठी समस्या बनली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्येही सर्वच पक्षांनी या मुद्द्यावरून रान उठवलं होतं. बेरोजगारीमुळे पंजाबमधील बहुसंख्य तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.