मोदी सरकारवर नाराज; वायएसआरचे सर्व खासदार देणार राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:41 AM2018-03-27T03:41:03+5:302018-03-27T03:41:03+5:30

वायएसआर काँग्रेसचे सर्व खासदार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामे देणार आहेत

Angry at Modi government; All YSR members will resign | मोदी सरकारवर नाराज; वायएसआरचे सर्व खासदार देणार राजीनामे

मोदी सरकारवर नाराज; वायएसआरचे सर्व खासदार देणार राजीनामे

Next

गुंटूर : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसचे सर्व खासदार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामे देणार आहेत. हा निर्णय वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी जाहीर केला. वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत ९ सदस्य आहेत.
ते म्हणाले की, मोदी सरकार सापत्न वागणूक देत आहे. आम्ही लोकसभेत आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नसल्याने अविश्वासाचा ठरावही मांडला. पण तोही चर्चेला येऊ नये, असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. संसदेचे अधिवेशन एप्रिल रोजी संपण्याची शक्यता आहे. त्याच्या दुसºया दिवशी आमचे लोकसभा सदस्य आपले राजीनामे अध्यक्षांकडे सादर करतील.
वायएसआर काँग्रेसवर भाजपाशी गुप्त मैत्रीचा होत असलेला आरोप पूर्णत: खोटा आहे, असे ते एका प्रश्नावर उत्तरले. आमचा भाजपाशी छुपा वा उघड कोणताही समझोता नाही, मैत्री नाही आणि त्यामुळे पुढील वर्षी राज्यात होणाºया विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावरच लढू, डावे पक्ष वा इतरांनी आमच्याशी आघाडी करण्याची तयारी दर्शवल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

तेलगू देसमला आवाहन
तेलगू देसम व आमच्या पक्षाची आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जाबाबतची मागणी समान आहे. त्यामुळे तेलगू देसमच्या लोकसभा सदस्यांनीही राजीनामे द्यावेत, तशा सूचना चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना द्याव्यात, असे आवाहनही रेड्डी यांनी केले. अर्थात तेलगू देसमने या आवाहनाला उत्तर दिलेले नाही. मात्र केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी तेलगू देसमही टोकाची भूमिका घेऊ शकते.

Web Title: Angry at Modi government; All YSR members will resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.