मुलाच्या Sex क्लिप पाहण्याच्या सवयीला कंटाळलेल्या पित्याने खाटिकाच्या सुऱ्याने तोडले मुलाचे हात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 05:15 PM2018-03-06T17:15:27+5:302018-03-06T17:17:17+5:30
खालेदने नुकतान स्मार्टफोन विकत घेतला होता. त्या फोनवर तो रात्री उशिरापर्यंत चित्रपट आणि पॉर्न क्लिप पाहत बसायचा. खालेदने ही वाईट सवय सोडावी म्हणून मोहम्मद कुरेशीने त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला.
हैदराबाद - स्मार्टफोनच्या आहारी गेलेला तरुण मुलगा मोबाइलवर तासनतास पॉर्न क्लिप पाहत बसतो म्हणून संतापलेल्या पित्याने कसाई वापरतो त्या सुऱ्याने मुलाचे हात तोडले. तेलंगणच्या सायबराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पहाडीशरीफ पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मोहम्मद कय्यूम कुरेशीला (43) अटक केली असून मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मोहम्मद कुरेशी पेशाने इलेक्ट्रिशियन आहे. तो मुलगा खालेदच्या स्मार्टफोनच्या सवयीला कंटाळला होता.
खालेदने नुकतान स्मार्टफोन विकत घेतला होता. त्या फोनवर तो रात्री उशिरापर्यंत चित्रपट आणि पॉर्न क्लिप पाहत बसायचा. खालेदने ही वाईट सवय सोडावी म्हणून मोहम्मद कुरेशीने त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यावरुन दोघांमध्ये वादही भरपूर व्हायचे. दोन दिवसापूर्वीच पॉर्न क्लिप पाहण्याच्या सवयीवरुन मोहम्मद कुरेशी आणि खालेदचे जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात खालेदने वडिलांना मारहाण केली आणि घराबाहेर निघून गेला.
खालेद त्या दिवशी रात्री उशिरा घरी परतला. खालेद आपली तीन भावंड आणि आई-वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री खालेद झोपलेला असताना त्याचे वडिल मोहम्मद कुरेशी त्याच्या रुममध्ये गेले. खालेद गाढ झोपेत असताना मोहम्मद कुरेशीने कसाई वापरतो त्या सुऱ्याने मुलाचे हात तोडले. खालेद आणि त्याच्या आईच्या जबानीवरुन पोलिसांनी मोहम्मद कुरेशीला अटक केली आहे.