अवैध प्रवाशी वाहतूक करणार्या ४२० वाहनांवर खटले दाखल अनिल देशमुख : २३ वाहनांचे परवाने केले निलंबित
By admin | Published: June 16, 2016 11:39 PM2016-06-16T23:39:39+5:302016-06-16T23:39:39+5:30
जळगाव: अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात ४२० वाहनांवर कारवाई करून न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत तर २३ वाहनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.
Next
ज गाव: अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात ४२० वाहनांवर कारवाई करून न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत तर २३ वाहनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या आदेशाने १ ते १५ जून या कालावधित कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. कारवाईनंतर ही वाहने वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आली होती. आता भविष्यात विना लायसन्स, ट्रीपल सीट, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे आदी नियमांचे भंग करणार्याविरुध्द कारवाई केली जाणार आहे. मनपाच्यावतीने शहरात पिवळे पार्किंग पे आखण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी वाहन लावणे अपेक्षित आहे. रिक्षाचालक व मालक यांनी गणवेश परिधान केला नसेल किंवा ठरलेल्या थांब्यावर रिक्षा उभी केेली नाही तर त्यांच्यावरही कारवाईची मोहीम सुरू केली जाणार आहे.