लग्नमंडप अक्षदा पडण्यापूर्वीच सोडण्याची दुर्दैवी वेळ हृदयद्रावक : मेहुण्यांचा मृत्यू झाल्याने घरातच झाला अनिल पवारचा विवाह
By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:13+5:302016-03-29T00:25:13+5:30
जळगाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या लग्नासाठी उभारलेल्या मंडपात वर्हाडी मंडळींकडून अक्षदा पडण्यापूर्वीच हा मंडप सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. अनिलच्या हळदीच्या दिवशी त्याच्या चुलत मेहुण्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुसर्या दिवशी घरातच साध्या पद्धतीने विवाह झाला.
Next
ज गाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या लग्नासाठी उभारलेल्या मंडपात वर्हाडी मंडळींकडून अक्षदा पडण्यापूर्वीच हा मंडप सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. अनिलच्या हळदीच्या दिवशी त्याच्या चुलत मेहुण्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुसर्या दिवशी घरातच साध्या पद्धतीने विवाह झाला.ममुराबाद रस्त्यावरील पवननगरात राहणारा अनिल रमेश पवार याचा विवाह सुरत येथील रहिवासी अशोक कदम यांच्या मुलीशी ठरलेला होता. २७ मार्चला सायंकाळी हळद समारंभ होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुणे मंडळीची जेवणाची पंगत बसलेली होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अचानक लग्न मंडपाच्या काही लोखंडी पाईपमध्ये विजेचा प्रवाह उतरला. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर अनिलचे चुलत मेहुणे जितेंद्र बळीराम मराठे (वय ३२, रा.थाळनेर, ता.शिरपूर) हे हात धुण्यासाठी मंडपाच्या बाहेर जात होते. त्याच वेळी पाईपला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या प्रकाराने मंडपात गोंधळ उडाला. पळापळीत रेखा संतोष जगताप (वय ४०, रा.तळवेल), ज्योती संजय चौधरी (वय २५, रा.चौघुले प्लॉट, जळगाव) व भरत ओंकार पवार (वय ६०, रा.पवननगर, जळगाव) यांनाही विजेचा धक्का बसला. काही लोकांनी प्रसंगावधान राखत वीज प्रवाह खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर जखमींना नागरिकांनी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी जितेंद्र मराठे यांना मृत घोषित केल्याने एकच शोककळा पसरली.घरात झाला विवाहलग्नासाठी दोन्ही पक्षाकडील वर्हाडी मंडळी बाहेरगावाहून जळगावला येण्यासाठी निघालेली होती. वधू पक्षाकडील वर्हाडीदेखील सुरतहून रविवारी सायंकाळीच निघालेले होते. त्यानंतर रात्रीच्या ११ वाजता अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांना रस्त्यातूनच परत पाठवणे शक्य नव्हते. तसेच वधू-वरांना हळद लावण्यात आली होती. म्हणून विवाह पुढे ढकलणे अशक्य होते. म्हणून दोन्ही पक्षाकडील ज्येष्ठ मंडळींनी पुढे येऊन विवाह तिथीनुसार मात्र, घरातच साध्या पद्धतीने लावण्याचे ठरवले. त्यानुसार सोमवारी सकाळी हा विवाह झाला.