छोट्या कपड्यांमुळे मुले उत्तेजित होतात, अत्याचाराच्या घटनेवर काय म्हणाले अनिरुद्धाचार्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 01:03 PM2024-08-18T13:03:02+5:302024-08-18T13:03:22+5:30

कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.

 Aniruddhacharya has given his opinion on the safety of women | छोट्या कपड्यांमुळे मुले उत्तेजित होतात, अत्याचाराच्या घटनेवर काय म्हणाले अनिरुद्धाचार्य?

छोट्या कपड्यांमुळे मुले उत्तेजित होतात, अत्याचाराच्या घटनेवर काय म्हणाले अनिरुद्धाचार्य?

कोलकाता येथे ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्या ही घटना ताजी आहे. देशातील इतरही राज्यांमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या घटनांमुळे महिलांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावरून रोष व्यक्त करत आहे. कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. सततच्या अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. 

आता प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी याबद्दल आपले मत मांडताना धर्माचा मुद्दा सांगितला. ते म्हणाले की, मला वाटते की, वाईट नजर आणि लहान कपडे या दोन्ही गोष्टींचा दोष असतो. सगळा दोष केवळ नजरेला का द्यायचा असा प्रश्न मला उद्भवतो. मात्र, वाईट नजर बाहेरच्यांवर का पडते या प्रश्नावर त्यांची कोंडी झाली. मग एक उदाहरण देत त्यांनी सांगितले की, एक सुधारलेला व्यक्ती असतो. त्याने एक दिवस कमी कपडे घातलेल्या मुलीला पाहिले. मग तो हळू हळू उत्तेजित होऊ लागला. पुढे तो त्याच्या जवळपास असलेल्या मुलीची छेड काढू लागला. हे लोकांना समजल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली. मग तुरुंगात जावे लागले. आता मला सांगा तो बिघडला याला कारणीभूत कोण? त्या मुलाची चूक होती हे मान्य करायलाच हवे. पण, आपण ज्या गोष्टी पाहत असतो याचा परिणाम होत असतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ते एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

"मुलगी म्हणजे एक हिरा असते"
दरम्यान, १८ ते ४५ वयोगटातील मुलींवर, महिलांवर अत्याचार झाल्याच्या दुर्दैवी घटना घडत असतात. पण, लहान मुलींवरही अत्याचार कसा काय होऊ शकतो. या कठीण प्रश्नावर व्यक्त होताना अनिरुद्धाचार्य यांनी सावध उत्तर दिले. अश्लील व्हिडीओ, फोटो आणि चित्रपट पाहणे यामुळे तरूणाई भरकटत चालली आहे. मुलगी म्हणजे एक हिरा असते... मुलगा समजून जा की लोखंड असतो त्याला गंज लागला तर थोडीशी किंमत कमी होईल. पण, मुलगी हिरा असल्याने तिचे पावित्र राखण्यासाठी सर्वाधिक बंधने घातली जातात. मुलीला संपूर्ण घर सांभाळावे लागते. त्यामुळे मुलींनी अधिक समजूतदार व्हायला हवे, असे त्यांनी नमूद केले. 

अनिरुद्धाचार्य पुढे म्हणाले की, एक मुलगा असतो तो बाहेर सर्वकाही वाईट कृत्य करायचा. पण, आपल्या घरात आल्यावर त्याच्या बहिणीचा आदर करत असे. यावरून समजते की, त्याच्यात अद्याप धर्म जिवंत आहे. धर्माचे हेच काम असते. ही तुझी बहीण, आई आहे हे धर्म शिकवत असतो. धर्माचे जो पालन करतो तो आपली बहीण आणि बाहेरील स्त्रीमध्ये अंतर पाहत नाही. त्यामुळेच धार्मिक वळणावर जा असे सांगितले जाते. प्रभू रामललामध्ये सर्वांसाठी धर्म होता... रावणामध्ये नव्हता असे म्हणता येणार नाही,पण त्याच्याकडे केवळ त्याच्या बहिणीसाठी धर्म होता. रावणाकडे कमी प्रमाणात धर्मभावना होती आणि प्रभू श्रीरामाकडे व्यापक प्रमाणात ही भावना होती. 

Web Title:  Aniruddhacharya has given his opinion on the safety of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.