९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:23 IST2025-04-22T15:23:26+5:302025-04-22T15:23:49+5:30
सासू आणि जावयाचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले.

९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
जावयासोबत पळून गेलेल्या सासूची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. या प्रकरणामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. सासू आणि जावयाचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले. याच दरम्यान सासूने आता प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही खूप व्हायरल झालो होतो. आमच्या बातम्या सर्वत्र सुरू होत्या. जेव्हा जेव्हा मोबाईल पाहायचो तेव्हा फक्त आम्हीच दिसायचो" असं सासूने म्हटलं आहे.
जावई राहुलने दिलेल्या माहितीनुसार, "९ दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला गेलो होतो. तिथून दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. मग तिथून थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात पोहोचलो. काही दिवस तिथे राहिले आणि त्यानंतर नेपाळ बॉर्डरकडे जाण्याचाही विचार केला. पण जेव्हा मी मुझफ्फरपूरमध्ये माझा मोबाईल वापरला तेव्हा मी पाहिलं की दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर दोघांनीही स्वतःहून परतण्याचा निर्णय घेतला. मुजफ्फरपूरहून बस पकडली, वाटेत मथुरेच्या गया कट येथे उतरलो आणि नंतर खासगी गाडीने अलीगढला पोहोचलो. तिथे दादोन पोलीस ठाण्यात सरेंडर केलं."
पोलीस स्टेशनमध्ये चौकशीदरम्यान सासूने सांगितलं की, मी अनेक वर्षांपासून घरगुती हिंसाचाराची बळी होती. दारू पिऊन नवरा मला दररोज मारहाण करायचा. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून माझा अपमान करायचा आणि अनेक वेळा मला घराबाहेर काढण्याची धमकीही द्यायचा. मुलीचं लग्न राहुलसोबत ठरलं होतं. राहुल जेव्हा जेव्हा फोन करायचा तेव्हा कधी माझी मुलगी बोलायची तर कधी मी. मुलगी आणि नवरा या दोघांनाही माझ्यावर संशय येऊ लागला. घरात भांडणं वाढली. नवरा तिला वारंवार टोमणे मारायचा. राहुलसोबत पळून जा असं म्हणायचा.
"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
सासूसोबत पळून गेलेला जावई राहुल म्हणाला की, "मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. बाकी तिची इच्छा आहे. माझी सासूवर वाईट नजर नव्हती. तिचा नवरा तिला त्रास द्यायचा. तो तिला मारहाण करायचा आणि खूप शिवीगाळ करायचा. ती तिच्याच पतीवर खूप नाराज होती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यही तिला सपोर्ट करत नव्हते. मग ती माझ्याशी बोलू लागला आणि तिने मला सर्व काही सांगितलं. ६ एप्रिल रोजी मी खरेदीसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मला तिचा फोन आला आणि ती म्हणाली की जर तू मला घ्यायला आला नाहीस तर मी मरेन. तिने कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मी तिथे गेलो होतो."