खडसेंचे जावई म्हणून कारची तपासणी नाही अंजली दमानिया : आरटीओ कार्यालयात पावणेदोन तास थांबल्या

By admin | Published: May 26, 2016 08:56 PM2016-05-26T20:56:23+5:302016-05-26T20:56:23+5:30

जळगाव : महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई असल्याने डॉ.प्रांजल खेवलकर यांची लिमोझीनकारची तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अजून केली नाही. या कारचे प्रकरण समोर येऊन १० दिवस झाले तरी कारवाई होत नाही. सर्वसामान्याची किंवा दुसर्‍या कुठल्या व्यक्तीची ही कार असती तर काय झाले असते हे आपल्याला ठावूक आहे. ही कार बेकायदेशीरपणे विकसित मॉडीफाय) केली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनी गुरुवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना केला. तसेच चा कारची ४८ तासात तपासणी करून कारवाई व्हावी, अशी मागणी दमानिया यांनी आरटीओ यांच्याकडे आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या एका दोन पानी इंगजी पत्राद्वारे केली.

Anjali Damania: No arrests in car for Khadse's son-in-law | खडसेंचे जावई म्हणून कारची तपासणी नाही अंजली दमानिया : आरटीओ कार्यालयात पावणेदोन तास थांबल्या

खडसेंचे जावई म्हणून कारची तपासणी नाही अंजली दमानिया : आरटीओ कार्यालयात पावणेदोन तास थांबल्या

Next
गाव : महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई असल्याने डॉ.प्रांजल खेवलकर यांची लिमोझीनकारची तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अजून केली नाही. या कारचे प्रकरण समोर येऊन १० दिवस झाले तरी कारवाई होत नाही. सर्वसामान्याची किंवा दुसर्‍या कुठल्या व्यक्तीची ही कार असती तर काय झाले असते हे आपल्याला ठावूक आहे. ही कार बेकायदेशीरपणे विकसित मॉडीफाय) केली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनी गुरुवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना केला. तसेच चा कारची ४८ तासात तपासणी करून कारवाई व्हावी, अशी मागणी दमानिया यांनी आरटीओ यांच्याकडे आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या एका दोन पानी इंगजी पत्राद्वारे केली.

सकाळी १०.१५ वाजता दमानिया आरटीओ कार्यालयात गेल्या. आरटीओ यांच्या दालनात त्या गेल्या. पण आरटीओ दालनात नव्हते. ते येत असल्याचा निरोप आला आणि आरटीओ १०.५५ वाजता आपल्या दालनात दाखल झाले.

गणपती यांना वंदन आणि हळू आवाजात मंत्रोच्चार
आपल्यासमोर दमानिया व इतर मंडळी बसलेली असताना आरटीओ सुभाष वारे यांनी खुर्चीवर बसताच हात जोडून समोरच्या श्रींच्या प्रतिमेस नमस्कार केला. तसेच हळू आवाजात मंत्रोच्चार केला. आपण हात का जोडता, वृत्तपत्रांमध्ये छापून आले तर..., असे गमतीने काही जणांनी या वेळी म्हटले. पण मी कुणी काहीही छापले तरी चालेल, मी कुणाला हात जोडून वंदन केले हे मला ठावूक आहे, असे वारे म्हणाले.


कार श्रेयस पारेखची, तेव्हा कारवाई झाली, मग आता का नाही
सध्या खडसे यांच्या जावयाकडे असलेली कार पूर्वी मुंबईत श्रेयस पारेख यांच्याकडे होती. ती बेकायदेशीरपणे विकसित केली म्हणून त्यासंबंधी कारवाई झाली होती. नंतर ही कार हरियाणामध्ये त्यांनी दिली. २०१२ मध्ये हरियाणातून ती जळगावात आली. जळगावात आली तेव्हा तिची तपासणी झाली नाही. सोनाटा म्हणून तिची नोंदणी केली. तिचे इंजिन, चॅचीस क्र. व ती कशी तयार केली आहे हे बघितले गेले नाही, असा दावा दमानिया यांनी केला.

तेव्हा माझे जावई नव्हते, असे खडसे कसे म्हणतात
ही कार खेवलकर यांनी आणली तेव्हा ते माझे जावई नव्हते, असे खडसे म्हणतात. पण आता तर खेवलकर हे त्यांचे जावई आहे. खडसे यांनी ही कार परत करून द्यावी, असेही दमानिया म्हणाल्या.

Web Title: Anjali Damania: No arrests in car for Khadse's son-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.