अंजली दमानियांचा खडसेंवर आरोप

By admin | Published: May 25, 2016 10:24 PM2016-05-25T22:24:49+5:302016-05-25T22:24:49+5:30

ज्या जमिनी दान देण्याची भाषा खडसे करतात...

Anjali Damaniya khadasenaver allegations | अंजली दमानियांचा खडसेंवर आरोप

अंजली दमानियांचा खडसेंवर आरोप

Next
या जमिनी दान देण्याची भाषा खडसे करतात...
जर अनागोंदी, आक्षेपार्ह आढळले तर मी माझ्या जमिनी अंजली दमानिया यांना दान देईन, असे खडसे म्हटले होते. त्या जमिनींची माहिती घ्यायला २६ रोजी दुपारी मुक्ताईनगरात जाणार आहे, असेही दमानिया म्हणाल्या.

दोन दिवस मुक्काम
विविध प्रकरणांची सविस्तर माहिती, काही कागदपत्र हवी असल्याने ती माहिती मिळण्यासाठी विलंब लागू शकतो. पण मी बुधवार आणि गुरुवार (२६ रोजी) असे दोन दिवस जळगाव शहरात मुक्कामी थांबेन. शुक्रवारी (२७ रोजी) सकाळी मुंबईला जाणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.

प्रकल्पाची किंमत का वाढली, पैसे कुठून गेले, शिफारशी कुणाच्या?
प्रकल्पांची किंमत का वाढली, पैसे कुठून दिले. शिफारसी कुणाच्या होत्या... मंजुर्‍या कुणी दिल्या...कंत्राटे कुणाची अशी माहिती दमानिया यांनी पाटबंधारे विभागात मागितली. ही माहिती आपण उघड करणार असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले.


माझा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही
आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी असल्याचा मुद्दा दमानिया यांच्याकडे उपस्थित केला असता त्या म्हणाल्या, डॉ.गाजरे हे माझे मित्र आहे. आम आदमी पार्टीच्या मंडळीसोबत काम केल्याने त्यांच्याशी परिचय आहे. माझा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

साध्या गणवेशातील पोलीसही दाखल
गिरणा भवनात दमानिया व त्यांचे सहकारी बसलेले असल्याने लागलीच सुरक्षा व इतर उपाय म्हणून पोलीस कर्मचारी दाखल झाले. सर्वच पोलीस साध्या गणवेशात होते. गिरणा भवनबाहेर पोलिसांची पांढर्‍या रंगाची गाडीही उभी होती. त्यात महिला कर्मचारी बसल्याचे दिसून आले. काही कर्मचारी आवारात फिरत होते व कानोसा घेताना दिसले.

खडसेंचा दबाव, जनतेने पुढे यावे
इकडे खडसेंचा दबाव असतो. पण जनतेने पुढे यायला हवे. मी तर सर्व प्रकरणे जनतेसमोर आणीन..., असेही दमानिया यांनी सांगितले.

गिरणा भवन जागले
पाटबंधारे व इतर विभागांचे कार्यालये असलेली गिरणा भवनची इमारत एरवी सायंकाळी शांत होते. पण दमानिया यांची माहिती गोळा करण्यासाठी गिरणा भवनात बुधवारी रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. सर्वच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात थांबून होते.

Web Title: Anjali Damaniya khadasenaver allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.