अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे दहन भाजपाचे आदोलन : टॉवर चौकात घोषणाबाजी
By admin | Published: June 1, 2016 08:54 PM2016-06-01T20:54:48+5:302016-06-01T20:54:48+5:30
जळगाव : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगरच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे टॉवर चौकात बुधवारी दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या.
Next
ज गाव : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगरच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे टॉवर चौकात बुधवारी दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या. महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून अंजली दमानिया या पुरावा नसताना आरोप करत असल्याची भूमिका व्यक्त करून भाजयुमो महानगरचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी दुपारी १२ वाजता टॉवर चौकात एकत्र आले होते. भाजपा जिल्हा कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. नंतर टॉवर चौकात एकत्र आलेल्या या कार्यकर्त्यांनी दमानिया यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. नियोजित कटदमानिया यांच्या माध्यमातून खडसे यांना बदनाम करण्याचा नियोजित कट असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, भूपेश कुलकर्णी, आनंद सपकाळे, हेमंत भंगाळे, सतीश पवार, सागर पाटील, राहूल पाटील, नीलेश तायडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, शिवदास साळुंखे, विजय गेही, अशोक लाडवंजारी, सुनील खडके, राहुल वाघ, प्रदीप रोटे, सरिता नेरकर, वंदना पाटील, उषा पाठक, मालन तडवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.