एका खास उद्देशाने भारतात आलीये अंजू; आयबी आणि पोलिसांच्या तपासातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 02:57 PM2023-11-30T14:57:23+5:302023-11-30T14:58:33+5:30

सहा महिन्यानंतर पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूची आयबी आणि पंजाब पोलिसांनी कसून चौकशी केली.

Anju came to India with a special purpose; Disclosures from IB and Police investigations | एका खास उद्देशाने भारतात आलीये अंजू; आयबी आणि पोलिसांच्या तपासातून खुलासा

एका खास उद्देशाने भारतात आलीये अंजू; आयबी आणि पोलिसांच्या तपासातून खुलासा

पाकिस्तानी नसरुल्लाहच्या प्रेमासाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू मायदेशी परतली आहे. अंजूने बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. मित्राला भेटण्यासाठी अंजून सहा महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली होती. आता अंजू परत का आली? ती कायमची भारतात आली आहे की, पाकिस्तानात परतणार आहे? तिचा भारतात येण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. स्वतः अंजूने या प्रश्नांचा खुलासा केला आहे. 

अंजूची अनेक तास चौकशी
पंजाबमध्ये आयबी आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाने अंजूची अनेक तास चौकशी केली, यावेळी अनेक खुलासे झाले. चौकशीदरम्यान अंजूने सांगितले की, ती 21 जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानी नागरिक असलेल्या नसरुल्लासोबत लग्न करण्यापूर्वी तिने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा खुलासाही तिने केला. त्यानंतर तिने इस्लामिक रितीरिवाजांनुसार नसरुल्लाशी लग्नही केले. मात्र, चौकशीदरम्यान अंजूने लग्नाशी संबंधित कोणतेही कागदपत्र दाखवले नाही.

'पाकिस्तानी लष्कराशी संबंध नाही'
आयबी आणि पोलिसांनी अंजूची पाकिस्तानी सैन्यासोबतच्या संबंधांबद्दल चौकशी केली, ज्यात तिने सांगितले की तिचा पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कर्मचार्‍यांशी संबंध नाही किंवा ती सैन्यात कोणाला ओळखत नाही. अंजूबाबत सर्वसामान्यांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत, हे विशेष.

पतीला घटस्फोट देऊन पाकिस्तानला परतणार
पोलिसांनी अंजूला पाकिस्तानात परत जाण्याबाबतही विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अंजूने सांगितले की, ती पती अरविंदला घटस्फोट देण्यासाठी भारतात आली आहे. या काळात ती आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल.

अंजू आणि नसरुल्लाची फेसबुकवर भेट
अंजू, पती अरविंद आणि दोन मुलांसोबत राजस्थानच्या अलवरमध्ये राहत होती. अंजू आणि तिचा नवरा दोघेही एका खासगी कंपनीत कामाला होते. यादरम्यान अंजूची पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहशी फेसबुकच्या माध्यमातून भेट झाली आणि दोघेही प्रेमात पडले. अंजू जयपूरला माहेरी जाण्याच्या बहाण्याने पाकिस्तानला गेली. ही बातमी समोर आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते.

Web Title: Anju came to India with a special purpose; Disclosures from IB and Police investigations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.