"ती माझ्यासाठी मेलीय..."; प्रियकरासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 02:14 PM2023-10-19T14:14:14+5:302023-10-19T14:15:15+5:30

राजस्थानमधील रहिवासी असलेली अंजू काही महिन्यांपूर्वी पती आणि मुलांना भिवडी येथे सोडून तिचा फेसबुक मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी गेली होती.

anju health deteriorated in pakista father said she died for me will never meet | "ती माझ्यासाठी मेलीय..."; प्रियकरासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं

"ती माझ्यासाठी मेलीय..."; प्रियकरासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं

अंजू भारतातूनपाकिस्तानात गेली होती आणि आता लवकरच ती भारतात येणार आहे, तिने स्वतः याचा खुलासा केला. राजस्थानमधील रहिवासी असलेली अंजू काही महिन्यांपूर्वी पती आणि मुलांना भिवडी येथे सोडून तिचा फेसबुक मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी गेली होती. तिने तिथे जाऊन नसरुल्लाहसोबत निकाह करून सर्वांना धक्का दिला. यानंतर तिचा व्हिसा वाढला आणि ती अजूनही पाकिस्तानात राहते. आता तिने सांगितले की, ती लवकरच भारतात परतणार आहे.

अंजूने सांगितलं की तिची तब्येत ठीक नाही. तिला ताप आहे आणि त्यामुळे ती जास्त बोलू शकत नाही. ती म्हणाली की, ती लवकरच भारतात येऊन मुलांना भेटणार आहे. पाकिस्तानात तिला तिच्या मुलांची खूप आठवण आली. तिला तिच्या मुलांशी जास्त बोलता येत नाही. अंजूला 2 मुलं आहेत, त्यापैकी मुलगी एंजल पती अरविंदसोबत आहे. अंजूचे वडील गयाप्रसाद थॉमस यांच्यासोबत मुलगा मध्य प्रदेशात आहे. 

अंजूचे वडील गया प्रसाद थॉमस म्हणाले की, ती माझ्यासाठी मेली आहे आणि मी तिच्यासाठी मेलो आहे. मृतांना कोणीही भेटू शकत नाही. ना ती माझ्याकडे येणार, ना मी तिच्याकडे जाणार, ना मला तिच्याबद्दल बोलायचे आहे. अंजूने सांगितलं की, तिच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. ती आपल्या मुलांसाठी भारतात परतत आहे. ती जे काही करत आहे ते तिच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आहे. 

अंजूने दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या मुलांशी बोलेल आणि जर त्यांना एकत्र राहायचे असेल तर ती त्यांच्यासोबत पाकिस्तानला परतेल. त्याच वेळी, जर मुलांना तिच्यासोबत भारतात राहायचे असेल, तर ती त्यांच्यासोबत भारतातच राहणार आहे. तिचे तिच्या पतीसोबतचे नाते तुटले आहे. पतीने आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप तिने केला आहे. आई-वडिलांना तिच्याबद्दल सर्व काही माहीत असल्याचेही अंजूने सांगितलं. पाकिस्तानात पोहोचल्यानंतरही तिने सर्वप्रथम कुटुंबीयांना माहिती दिली. टीव्ही 9 भारतवर्षने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: anju health deteriorated in pakista father said she died for me will never meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.