"ती आमच्यासाठी मेली"; पाकिस्तानात जाऊन निकाह केलेल्या अंजूच्या वडिलांनी सांगितलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:11 PM2023-07-26T15:11:46+5:302023-07-26T15:12:25+5:30
अंजूने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं. मुलीच्या या कृत्याने अंजूच्या वडिलांना दु:ख झालं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर मैत्री केल्यानंतर भारतातून अंजू तिचा मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली. अंजू कायदेशीररित्या व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली होती, पण आता तिने तिथे धर्म बदलला आणि नसरुल्लाह या मित्राशी निकाह केला आहे. अंजूने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं. मुलीच्या या कृत्याने अंजूच्या वडिलांना दु:ख झालं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मध्य प्रदेशातील टेकनपूर येथे राहणारे अंजूचे वडील म्हणाले, "ती आमच्यासाठी आता मेली आहे. मला कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. आता तिच्याशी माझं काही देणं-घेणं नाही, ती तिला हवं ते करू शकते." मुलीच्या पाकिस्तानात जाण्याच्या प्रश्नावर वडील म्हणाले की, तिचं काय चाललं होतं हे मला माहीत नाही कारण मी गेलं एक वर्ष तिच्याशी बोललो देखील नाही.
जी मुलगी आपल्या मुलांना सोडून गेली, तिच्याशी आमचं नातं संपलं आहे. नवऱ्याला सोडा, जी स्वत:च्या मुलांना सोडून गेली त्या मुलीशी माझा संबंध कसा असू शकतो? असं म्हटलं आहे. दुसरीकडे, व्हिसाची मुदत संपल्यानंतर देशात परतण्याच्या प्रश्नावर अंजूच्या वडिलांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपली काय किंवा ती स्वतःच संपली काय आता याच्याशी माझा काहीही संबंध नाही.
अंजूने दोन मुलांचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आता 14 वर्षांच्या मुलाची आणि 5 वर्षांच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार? असंही म्हटलं. पाक मीडियाच्या रिपोर्टनुसार, अंजूने तिचा धर्म बदलला आहे, त्यानंतर अंजूचे इस्लामिक नाव फातिमा ठेवण्यात आले आहे. प्रियकरासाठी अंजू भारतातून पाकिस्तानात गेली आणि त्यानंतर आता तिने निकाह केला आहे, सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.