पाकिस्तानातून अंजूचा नवा व्हिडिओ व्हायरल, बुरख्यामध्ये दिसली; सोबतची तिसरी व्यक्ती कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:04 PM2023-07-28T12:04:01+5:302023-07-28T12:04:30+5:30
महत्वाचे म्हणजे, अंजू व्यतिरिक्त या डिनर पार्टीमध्ये नसरुल्लाहचे अनेक मित्रही दिसत आहेत.
राजस्थानच्या अलवरमधून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा एक नवा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अंजू, नसरुल्लासोबत बसून डिनर घेत असून तिने बुरखा परिधान केल्याचेही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या सोबत आणखी एक तिसरी व्यक्तीही दिसत आहे. यापूर्वी, ज्या व्यक्तीने अंजू आणि नसरुल्लाचा व्हिडिओ जारी केला होता, तीच ही तिसरी व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ एका पाकिस्तानी पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यापूर्वीही सोर आले आहेत अंजूचे व्हिडिओ -
महत्वाचे म्हणजे, अंजू व्यतिरिक्त या डिनर पार्टीमध्ये नसरुल्लाहचे अनेक मित्रही दिसत आहेत. तसेच, या व्हिडियोच्या बॅकग्राउंडला पठान चित्रपटाचे गाणेही सुरू सुरू आहे. यापूर्वी, वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात एन्ट्रीचा व्हिडिओ, यानंतर, नसरुल्लाहसोबत निकाहच्या बातम्यांबरोबरच खैबर पख्तूनख्वामधील फोटोशूटचा व्हिडिओ, यानंतर, अंजू आणि नसरुल्लाह यांचा लग्नाच्या चर्चा फेटाळून लावल्याचा व्हिडिओ आणि आता हा डिनर पार्टीच्या व्हिडिओ समोर आला आहे.
کیا پشتون گھروں میں یے رواج بھی ہے کہ تمام دوستوں کے سامنے اپنی بیوی کو پیش کرکے ٹک ٹاک بناکر ویوز بھٹورے جائیں یے سب مایا جلدی مشہور ہونے کی ہے کیا سیما کسی مردوں کے ھجوم میں تھی؟ نصراللہ کو کون استعمال کررہا ہے؟#Nasrullah#Anju#AnjuNasrullahLoveStory#Anjuinpakistanpic.twitter.com/8KaOY8fEi0
— Dileep kumar khatri🦚 (@DileepKumarPak) July 26, 2023
अंजूने मुस्लीम धर्म स्वीकारत नसरुल्लाह सोबत निकाह केल्याच्या आणि स्वतःचे नाव बदलून फातिमा ठेवल्याच्या चर्चा सुरू असतानाच, तिचा पती अरविंद म्हणाला, अंजू खोटे बोलून पाकिस्तानात गेली आहे. ती आता परत आली, तरी आपण तिचा स्वीकार करणार नाही. ती नसरुल्लाकडे स्वतःच्या इच्छेने गेली आहे. तिने येथे कुणालाही सांगितलेले नाही. मुलंही आईवर नाराज आहेत. एवढेच नाही, तर तिला परत येण्याची गरज नाही, आम्हाला तिचे तोंडही पाहायचे नाही, असे मुलीने म्हटल्याचेही अरविंदने म्हटले आहे. अंजूला दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीसाठी जाण्याच्या नावाखाली पासपोर्ट मिळाला होता.
दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीला जाण्याच्या नावाखाली तयार केला होता पास्पोर्ट -
अंजूचा पती अरविंद हा भिवडी येथेच एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याने सांगितले, अंजूने दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या निमित्ताने पासपोर्ट काढला होता. चार दिवसांपूर्वी ती जयपूरला फिरायला जात असल्याचे सांगून भिवडीहून निघाली होती. यानंतर तिने व्हॉट्सअॅप कॉल करून आपण लाहोरला पोहोचल्याचे सांगितले. 21 जुलै 2023 रोजी ती पाकिस्तानात पोहोचली. अरविंद 2005 पासून भिवडी येथे राहतो. त्याला दोन मुलं आहेत, तो येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो.