Video: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला, नसरुल्लाहसोबत लग्नही केले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 04:42 PM2023-07-25T16:42:25+5:302023-07-25T16:44:50+5:30
काही दिवसांपूर्वीच फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानात गेली होती. आता तिने तिथेच लग्न केले आहे. पाहा व्हिडिओ...
गेल्या काही दिवसांपासून भारतीय मीडियामध्ये पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सीमा आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातूनभारतात आली. पण, आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे प्रकरणही चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी अंजून व्हिसा काढून भारतातून पाकिस्तानात गेली. आता अशी माहिती समोर आली आहे की, अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला असून, नसरुल्लाहसोबत लग्नही केले आहे.
A pretty girl #Anju from #india in #pakistan...Says she is in love with #KhyberPukhtunkhwa and its culture... she's going back on 20th August.... pic.twitter.com/sx6JFqTmkB
— Sumaira Khan (@sumrkhan1) July 25, 2023
मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी रितसर व्हिसा घेऊन पाकिस्तानला गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तसेच, तिने नसरुल्लाहशी लग्नही केले आहे. सध्या मीडियामध्ये तिचा आणि नसरुल्लाहचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, अंजूचे आधीच भारतात लग्न झाले असून तिला दोन मुलेही आहेत. अंजू ख्रिश्चन धर्मातून इस्लाम धर्मात गेली असून, आता तिने आपले नावही फातिमा ठेवल्याची माहिती मीडियातून समोर येत आहे.
नसरुल्लाहच्या घरात राहतीये अंजू
यापूर्वी एका पाकिस्तानी न्यूज वेबसाइटने दावा केला होता की, खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, अंजू नसरुल्लासोबत अगदी आनंदाने राहत आहे. तसेच, अंजूने पोलिसांना सांगितले की, तिने तिच्या पतीला भारतात घटस्फोट दिला आहे. अंजूबद्दल मीडियाला माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते की, अंजूच्या पाकिस्तानात येण्याचा तपास पूर्ण झाला आहे. ती एका महिन्याच्या व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानात आली आहे आणि तिची सर्व कागदपत्रे वैध आणि योग्य आहेत.
कोण आहे अंजू?
अंजू उत्तर प्रदेशच्या कलोरची रहिवासी आहे. ती एका खाजगी कंपनीत काम करते आणि 2007 मध्ये तिचे लग्न अरविंदसोबत झाले होते. लग्नानंतर अंजू पतीसोबत राजस्थानमधील भिवडी येथे राहायला आली. लग्नानंतर तिला अरविंदपासून दोन मुलेही आहेत. अंजू फेसबुकच्या माध्यमातून नसरुल्लाच्या संपर्कात आली आणि त्यानंतर त्यांची मैत्री झाली. यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले. काही दिवसांपूर्वीच ती त्याला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली.