अंकिता भंडारी प्रकरण लोकसभा निवडणुकीत ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:57 AM2024-04-13T06:57:39+5:302024-04-13T06:58:27+5:30
अंकिता भंडारी यांची २०२२ मध्ये मालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी कथितपणे हत्या केली होती.
डेहराडून : मतदारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बनलेली अग्निवीर लष्करी भरती योजना आणि अंकिता भंडारी हत्या प्रकरण हे मुद्दे भाजपच्या निवडणुकीच्या भवितव्यावर परिणाम करू शकतात, असे उत्तराखंडच्या गढवाल भागातील लोक म्हणतात.
सैनिकांची भरती करू पाहणाऱ्या केंद्राच्या अग्निवीर योजनेमुळे सशस्त्र दलात सामील होण्यासाठी इच्छुक तरुण अस्वस्थ झाले आहेत, असे अनेकांनी सांगितले. भाजपच्या माजी नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी असलेल्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही चिंता आहे. ऋषिकेशजवळील एका रिसॉर्टमध्ये १९ वर्षीय रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी यांची २०२२ मध्ये मालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी कथितपणे हत्या केली होती.