Ankita Bhandari Murder Case: पुलकितने अंकिताची हत्या का केली? SIT च्या तपासात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:44 AM2022-10-04T11:44:56+5:302022-10-04T11:45:39+5:30

डेहराडून येथील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. एसआयटीकडे आरोपीविरोधात महत्वाचे पुरावे सापडले आहेत.

Ankita Bhandari Murder Case Big revelation in SIT's investigation | Ankita Bhandari Murder Case: पुलकितने अंकिताची हत्या का केली? SIT च्या तपासात मोठा खुलासा

Ankita Bhandari Murder Case: पुलकितने अंकिताची हत्या का केली? SIT च्या तपासात मोठा खुलासा

Next

नवी दिल्ली : डेहराडून येथील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. एसआयटीकडे आता आरोपीविरोधात महत्वाचे पुरावे सापडले आहेत. कोठडी मिळाल्यानंतर आरोपींनी चौकशीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. एसआयटीने आरोपी पुलकित आर्या याला घेऊन ज्या ठिकाणी अंकिताचा मृददेह सापडला त्या ठिकाणी चौकशीसाठी गेले होते. या प्रकरणी लवकरच पोलीस आरोपपत्र दाखल करणार आहेत.

एसआयटीला मिळालेले पुरावे तपासत आहेत. हे रिसॉर्ट तोट्यात होते असं एसआयटीच्या तपासात उघाड झाले आहे. त्यामुळे पुलकितला विशेष सेवेद्वारे रिसॉर्टमधून नफा कमवायचा होता. पुलकितने यासाठी अंकितावर दबाव आणल्याचा दावा एसआयटीने केला आहे. अंकिताचे वय अवघे १९ ​​वर्षे होते. ती गरीब कुटुंबातील होती. आर्थिक परिस्थितीमुळे ती नोकरी करत होती. याचा फायदा घेत पुलकित तिच्यावर सतत दबाव टाकत होता. अंकिताने त्या कामाला नकार दिल्यानंतर त्याने अंकिताची हत्या केली. ती आपले काळे कारनामे उघड करेल अशी भीती पुलकितला होती, असा खुलासा एसआयटीने केला आहे. 

अंकिता हत्याकांड : रिसॉर्टमध्ये मुलींशी व्हायचे गैरवर्तन

त्या रिसॉर्टमध्ये व्हीआयपींसाठी विशेष सुविधा होती. एसआयटीला रिसॉर्टमधील काही सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. या फुटेजची तपासणी एसआयटी सध्या करत आहे. यात अनेक खुलासे होणार असल्याचे बोलले जात आहे. रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांची चौकशीही एसआयटीने केली आहे. तसेच मागील दोन महिन्यात कोण-कोण येऊन गेले त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. 

Web Title: Ankita Bhandari Murder Case Big revelation in SIT's investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.