अण्णा पुन्हा रामलीलावर, दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:53 AM2018-03-24T04:53:48+5:302018-03-24T04:53:48+5:30

शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.

 Anna again in Ramlila, incessant hunger strike in Delhi | अण्णा पुन्हा रामलीलावर, दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू

अण्णा पुन्हा रामलीलावर, दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू

Next

- विकास खाडे/विनोद गोळे

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.
राजघाटवर महात्मा गांधीजींच्या, तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधीचे दर्शन घेऊ न अण्णा रामलीला मैदानावर आले. राजस्थानी शेतकºयांनी सादर केलेल्या क्रांतिगीतानंतर अण्णांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून येणा-या शेतकरी संघटनांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.
अण्णा म्हणाले की, शेतक-यांना उत्पादन खर्चाप्रमाणे भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या प्रश्नांबाबत मी ४३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मात्र, प्रश्न सुटत नाही. मी उपोषण करू नये, म्हणून मंत्री मला तीन-चार वेळा भेटून गेले. कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनीही दिले. मात्र, शेतकरी प्रतिनिधींशी मी यावर चर्चा करेन, तुम्हीही त्यांच्यासमोर येऊन बोला, असे कृषिमंत्र्यांना सांगितले आहे. याबाबतचा निर्णय होईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील.

कोणी मुख्यमंत्री तर कोणी मंत्री झालेत
२0१२ मधील आंदोलनाच्या वेळी कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे हरयाणातील निवृत्त न्यायाधीश प्रीतमपाल अण्णांसोबत होते. आजही ते होते. त्यांचा उल्लेख करून अण्णा म्हणाले की, त्या आंदोलनाची टीम फुटली. कोणी मुख्यमंत्री, कोणी मंत्री झाले. सच्चे आंदोलक मात्र, आजही आमच्यासोबत आहेत. या आंदोलनातून कोणीही केजरीवाल, मंत्री, पक्ष तयार होणार नसून, शेतकºयांचे व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती आहे, असे अण्णांनी सांगितले.

महाराष्ट्रासह देशभरातून मिळतोय पाठिंबा
अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनेही झाली. अनेक संघटनांनी अण्णांचा फोटो सोबत घेऊन आंदोलन केले. महाष्ट्रातही मोदी सरकारचा निषेध करत, अण्णासमर्थक काही काळ रस्त्यावर घोषणाबाजी करताना दिसले.

अण्णांना अश्रू अनावर
भगतसिंग, सुखदेव, राजगुरूया क्रांतिकारकांनी आजच्या दिनी स्वत:ची आहुती दिली. देशात लोकशाही नांदावी, असे या क्रांतिकारकांचे स्वप्न होते, पण कोठे आहे स्वातंत्र्य व लोकशाही? गांधीजींचे स्मरण करून हजारे म्हणाले की, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. त्यासाठी स्वत:चा बळी द्यावा लागला, तरी
चालेल. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता अण्णा हजारे महाराष्ट्र सदनमधून थेट राजघाटावर गेले. तेथे महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळाचे अण्णांनी दर्शन घेतले. या वेळी अण्णांना अश्रू अनावर झाले.

सरकारने बसेस, रेल्वे रोखल्या
या आंदोलनासाठी येणा-यांच्या बसगाड्या सरकाररोखत आहे. रेल्वेगाड्या रद्द करीत आहे. याला लोकशाही म्हणायचे का? तरीही लोक दिल्लीकडे येत आहेत. मी अधूनमधून बोलत राहीन. बोलण्यामुळे ऊर्जा कमी होत असली, तरी मला पर्वा नाही.

Web Title:  Anna again in Ramlila, incessant hunger strike in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.