अण्णा हजारे -गिरीश महाजन भेटीनंतरही उपोषण सुरुच, उद्या केंद्रीय मंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 03:47 PM2018-03-26T15:47:01+5:302018-03-26T16:14:24+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंधरापैकी अकरा मागण्यांवर अण्णांची समजूत काढण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश मिळाले आहे. उपोषण सुरु असलेल्या रामलीला मैदानात त्यांनी अण्णांशी चर्चा केली. उरलेल्या चार मागण्यांबद्दल केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच अण्णा उपोषण मागे घेण्याबद्दल निर्णय घेणार आहेत.
- राळेगणला जमले नाही ते दिल्लीत पटवून दाखवणार?
नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंधरापैकी अकरा मागण्यांवर अण्णांची समजूत काढण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश मिळाले आहे. उपोषण सुरु असलेल्या रामलीला मैदानात त्यांनी अण्णांशी चर्चा केली. उरलेल्या चार मागण्यांबद्दल केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच अण्णा उपोषण मागे घेण्याबद्दल निर्णय घेणार आहेत.
अण्णांच्या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद लाभत नसला तरी दिल्लीच्या उन्हाळ्यात उपोषण करणाऱ्या अण्णांची प्रकृती ढासळली तर सरकारविरोधी जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे. त्यामुळेच भाजपाकडून पुन्हा एकदा अण्णांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गिरीश महाजनांना अण्णांकडे रामलीला मैदानात पाठवण्यात आले.
२३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण सुरु केले आहे. दिल्लीत गेल्यावेळी मिळालेला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी दिल्लीचा ऊन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात अण्णांची प्रकृती जास्तच खालावली तर जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी उपोषणाला गंभीरतेने घेतले आहे. अण्णांनी उपोषणच करु नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांच्या माध्यमातून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला होता. मात्र अण्णांनी दाद दिली नव्हती. आता मात्र उपोषणाचा चौथा दिवस असताना परिस्थिती चिघळू नये यासाठी पुन्हा एकदा गिरीश महाजनांनाच अण्णांकडे पाठवण्यात आले होते.