‘सत्तेसाठी अण्णा हजारे यांचा वापर केला गेला’, किरेन रिजिजू यांचा आपवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:20 AM2023-04-17T06:20:54+5:302023-04-17T06:21:16+5:30
Anna Hazare: भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ता बळकाविण्यासाठी आप पक्षाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वापर केला, असा आरोप केंद्रीय विधि खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे.
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ता बळकाविण्यासाठी आप पक्षाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वापर केला, असा आरोप केंद्रीय विधि खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे.
अबकारी धोरणाबद्दल अण्णा हजारे यांनी एका मुलाखतीत टीका केली होती. त्यातील काही व्हिडीओ किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर शेअर केले. रिजिजूंनी म्हटले आहे की, आता आप पक्षाने सत्ता मिळविली आहे. हा पक्ष अण्णा हजारे यांनी केलेल्या टीकेकडे कानाडोळा करतोय. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपने भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा वापर केला अशी टीका रिजिजू यांनी केली आहे.
केजरीवाल, संजय सिंह यांना न्यायालयाचे समन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधाने करून गुजरात विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यावर अहमदाबाद न्यायालयाने समन्स बजावले आहे.