अण्णा हजारेंचा मंच आता अधिक राजकीय झालाय!
By Admin | Published: March 1, 2015 11:40 PM2015-03-01T23:40:48+5:302015-03-01T23:40:48+5:30
समाजसेवक अण्णा हजारे यांचा मंच आता अधिक राजकीय झालेला आहे व तो आता सामाजिक अजिबात राहिलेला नाही
गाझियाबाद : समाजसेवक अण्णा हजारे यांचा मंच आता अधिक राजकीय झालेला आहे व तो आता सामाजिक अजिबात राहिलेला नाही, अशी टीका अण्णांचे एकेकाळचे सहकारी व सध्या मोदी सरकारमध्ये संरक्षण राज्यमंत्री असलेले व्ही.के. सिंग यांनी केली आहे.
केंद्राने मांडलेल्या भूमी अधिग्रहण विधेयकावरून सध्या देशातील वातावरण चांगलेच तापलेले आहे व अण्णा यांनीही या विधेयकाच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. या विधेयकाचा संदर्भ देत सिंग यांनी अण्णांना लक्ष्य बनविले. ते म्हणाले की, ‘मी अण्णांचा आदर करतो; परंतु एकेकाळी मुद्यांवरून लढणारे कार्यकर्ते अण्णांच्या मंचावर असायचे त्यावेळी त्यांचा आदर वाटे. आता त्यांचा मंच सामाजिक राहिलेला नसून पूर्णपणे राजकीय बनलेला आहे.’