(निनाद) बोपदेव घाट होतोय कचरा डेपो
By admin | Published: April 25, 2015 02:10 AM2015-04-25T02:10:40+5:302015-04-25T02:10:40+5:30
Next
>रस्त्याच्या दुतर्फा घाण : कारवाईची मागणी नारायणपूर : सासवड-कोंढवा रस्त्यावरील बोपदेव घाटात आणि घाटाच्या पायथ्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूंस राजरोस कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे, या घाटाला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. बोपदेव घाटाच्या पायथ्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात येतो आहे. यामध्ये हॉटेलमधील घाण, शहरातील ओला कचरा, मातीचा राडारोडा, उसाचा रस काढलेली चिपाडे, कुजलेला नसलेला भाजीपाला, खराब फळे आदी कचरा या ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच टाकला जातो. काहीवेळा तर तो रस्त्यावरही येत असल्याने वाहनांचे किरकोळ अपघातही झाले आहेत. हा कचरा पेटविण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हे प्रकार जर आत्ताच रोखले नाही तर भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल. या ठिकाणी वणवा लागण्याची मोठी भीती आहे. या परिसरात वन्यजीवांचा मोठा वावर आहे. वणव्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहीला आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी संबधित विभागाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस राहुल गिरमे यांनी केली आहे.कोटअशाप्रकारे रस्त्यावर टाकणे गुन्हा आहे. रस्त्यावर कचरा टाकताना जर कोणी आढळला तर त्याच्या विरोधात आम्हाला पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे. मात्र, कारवाई किंवा दंड करण्याचा अधिकार तालुक्याचे तहसिलदार यांना आहेत. रावसाहेब निगडे, अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग सासवड. ( वार्ताहर ) फोटो ओळ ; सासवड-कोंढवा रस्त्यावरील बोपदेव घाटात आणि घाटाच्या रस्त्याच्या बाजूला टाकलेला कचरा
छायचित्र - सुरेश कामठे