Anna Hazare Hunger Strike : अण्णांचे उपोषण सुरुच, प्रकृतीबाबत चिंता, कोअर कमिटीची तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 09:35 AM2018-03-29T09:35:01+5:302018-03-29T11:35:28+5:30

अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची रणनिती ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. 

Anna's hunger strike, concern about health, emergency meeting of Core Committee | Anna Hazare Hunger Strike : अण्णांचे उपोषण सुरुच, प्रकृतीबाबत चिंता, कोअर कमिटीची तातडीची बैठक

Anna Hazare Hunger Strike : अण्णांचे उपोषण सुरुच, प्रकृतीबाबत चिंता, कोअर कमिटीची तातडीची बैठक

Next

नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण आजच्या दिवशीही सुरुच आहे. अण्णांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले असून त्यांना भरपूर पाणी पिण्याचा तसेच आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची रणनिती ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, आंदोलनस्थळी केवळ महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कागद घेऊन येतात. केंद्र सरकारकडून ठोस आश्वासने नाहीत. निव्वळ धूळफेक चालली आहे. मोदी सरकार शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हिताचे नाही. आता मोदी सरकारचीही घरी जाण्याची वेळ आली असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली.
अण्णांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. त्यांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले असून त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. याचबरोबर, आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 15 आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत. रामलीला मैदानावर गर्दीचा जोर जरी ओसरला असला तरी आंदोलकांमध्ये जोश अद्यापही कायम आहे. गुरुवारी जवळपासच्या राज्यातील 10 हजार शेतकरी इथे दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला.
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी चर्चा केली. पण चर्चेतून तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी 15 मिनिट फोनवरून चर्चा केली. अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी लोकपालविषयी सरकारकडून खूप वेळ घेतला जात आहे, कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
 

Web Title: Anna's hunger strike, concern about health, emergency meeting of Core Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.