्न्न्नगगनगिरी आश्रमातर्फे अन्नछत्र
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM2015-07-29T00:42:30+5:302015-07-29T01:18:44+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील बसस्थानकाशेजारी वसलेल्या स्वामी गगनगिरी महाराज आश्रमातर्फे १३ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत जवळजवळ सव्वा महिना विविध धार्मिक कार्यक्रम व अखंड अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमाचे व्यवस्थापक महंत प्रकाशगिरी यांनी दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, सकाळी चहा, नास्ता, ११ वाजता भोजन असे नियोजन असून, ११ वाजेपासून सुरू झालेला भोजन समारंभ दुपारपर्यंत सुरू राहाणार आहे. सायंकाळी ९ ते ११ या वेळेत रात्रीचे भोजन दिले जाईल. या आश्रमातर्फे या अन्नछत्रातून दर दिवशी ४ ते ५ हजार भाविक, साधू-महंत, शासकीय कर्मचारी भोजनाचा लाभ घेऊ शकणार आहेत. आश्रमातर्फे दोन ठिकाणी स्वतंत्र पाकशाळा असणारे दोन अन्नछत्र चालणार असून, यासाठी २ ते अडीच हजार लोकांची टीम (स्वयंपाकी, मदतनीस, स्वयंसेवक) कार्यरत आहेत.
आश्रमातर्फे अन्न छत्राबरोबरच दररोज पूजापाठ, होमहवन, कीर्तन, भजन आदि धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू राहाणार आहेत. या शिवाय आश्रमाच्या सभागृहातच आरोग्य शिबिरामार्फत अखंड वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आयुर्वेदिक व ॲलोपॅथीअसे ३ ते ५ डॉक्टर्स व पारिचारिका येथे कार्यरत राहाणार आहेत. रुग्णांची तपासणी करून औषधे दिली जाणार आहेत.
आश्रमाला या कालावधीत मंत्री, उद्योजक, साधुसंत, शासकीय, प्रशासकीय प्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने भेट देणार असून, त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
----