कलम ३७० रद्दची वर्षपूर्ती! विकासाच्या दृष्टीने पावले खुंटलेलीच...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 10:58 AM2020-08-05T10:58:45+5:302020-08-05T11:03:52+5:30

काश्मिरमध्ये आजही अनेक सेवा बंद..

Anniversary of section 370 cancelled! Steps have been stop of development In Jammu and Kashmir | कलम ३७० रद्दची वर्षपूर्ती! विकासाच्या दृष्टीने पावले खुंटलेलीच...

कलम ३७० रद्दची वर्षपूर्ती! विकासाच्या दृष्टीने पावले खुंटलेलीच...

googlenewsNext
ठळक मुद्दे  भविष्यात बदल होण्याची तरूणांना अपेक्षा  

निनाद देशमुख
पुणे : दहशतवाद, सातत्याने लादल्या जाणाऱ्या कर्फ्यूमुळे काश्मिरी नागरिक आधिच त्रस्त होता. त्यात ३७० कलम रद्द करत काश्मिर केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. या निर्णयाने वेगाने विकास होईल अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, वर्षाच्या सुरूवातीला कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन यामुळे काहीच झाले नाही. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.  येत्या काळात आम्हाला आमचे हक्क मिळतील अशी अपेक्षा काश्मिरी तरूणांनी व्यक्त केली.

५ आॅगस्ट २०१९ ला केंद्रसरकारने एतिहासिक निर्णय घेत जम्मुकाश्मिरचे विभाजन करत दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. या निर्णयास अनेक स्थानिकांनी विरोध केला तर काहींनी स्वागत केले. हा निर्णय घेतांना येथील  रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, उद्योगधंदे येतील, दहशतवाद संपले, तसेच फुटीरतावादी वृत्तींना आळा बसेल असे सांगण्यात आले. हा निर्णय घेतांना सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने कर्फ्यू लावला. महाविद्यालये शाळा बंद करण्यात आली. या सोबतच इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली. दरम्यान टप्याटप्याने हे बंधने उठवण्यात आली. मात्र, काही निर्बंध येथे आजही आहेत. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात ना रोजगार आलेत ना निर्बंध हटले.  

कुपवाडा जिल्ह्यातील जहिद अजिज शेख याने बीकॉम शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो कंत्राटदार आहे. मात्र, गेल्या वर्षभरात येथील नव्या निर्बंधामुळे त्याला कुठलेही नवे कंत्राट मिळालेले नाही. शिवाय अनेक शासकीय कंत्राटांचे आधीचे बीलही थकले असल्याचे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले. शाळा महाविद्यालये बंद असल्याने अनेक तरूण बेरोजगार आहेत. यामुळे दहशतवाद्यांकडे तरूण आकर्षित होत आहेत. राज्याच्या दर्जा असतांही या समस्या आमच्या पुढे कायम होत्या. त्या आजही आहेत. राज्याचा दर्जा पूर्वी असल्याने आम्ही आमच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे मांडू शकत होतो. मात्र, आता हा अधिकारही आमच्याकडे राहिलेला नाही.

नाशिक येथे होमीओपॅथीचे शिक्षण घेत असलेली आणि मुळची  अनंतनाग जिल्ह्यातील असलेली नादीया शेख म्हणाली, केंद्रशासीत प्रदेश बनल्याने विकास होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरवातीला असलेल्या बंदमुळे आणि कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मर्याचा प्रशासनाला आल्या असतील. येत्या काळात नक्कीच यात बदल होईल अशी आशा आहे.

बीएससी आणि सिव्हील इंजिनिअर असलेला कुपवाडा येथील शौकत अहमद मीर म्हणाला, काश्मिरमध्ये वर्षभरात दोन मतप्रवाह पाहयला मिळाले. एक बाजुने आणि एक विरोधी. नागरिकांना रोजगार असेल तर त्यांना असल्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे प्राधान्यांने रोजगार निर्मिती करायला हवी. सध्या कोरोनामुळे सर्व बंद आहेत. नागरिकांना धान्याचा पुरवठा झाला. पण कामे नसल्याने विरोधाचा सुर वाढतो आहे.

दहशतवाद्यांच्या घटनेत वाढ
वर्ष भरात अनेक दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आले. लष्कर आणि पोलीसांतर्फे या कारवाया करण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांना यात यश आले असले तरी दहशतवाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे.
.....
लॉकडाऊमध्ये जे देश भोगतोय ते आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन लावण्यात आला आहे. यामुळे नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. आता या लॉकडाऊनला विरोध होत आहे. मात्र, कुठल्याही प्रकारची महामारी नसतांना आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून असे लॉकडाऊन भोगत आलेलो आहे. त्यामुळे संपुर्ण देशाला आमच्यावर काय अत्याचार होत आहे याची प्रचिती आली असेल.
- जहिद अजिज शेख, कुपवाडा


 ----
पर्यटनही बंद
देशाचे नंदवन
असलेल्या जम्मु काश्मिरमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यामुळे या ठिकाणी बेरोजगारी वाढली आहे.
---

विकासासाठी वाट पाहावी लागेल
पाकिस्तानला थेट युद्धात भारताला हरवीने कठीण असल्याने त्यांनी दहशवादाचा स्विकार केला. १९९४पासून येथे दहशतवाद वाढतोय. स्थानिक राजकीय पुढा-यांनीही स्व:ताच्या फायदा बघत येथे विकास होऊ दिला नाही. परिणामी येथील दरी ही दिवसेंदिवस वाढत गेली. लष्कराने दहशतवादाविरोधात मोठी आघाडी या परिसरात घेतली असली तरी दहशतवाद कमी झालेला नाही. येथील तरूणांना या प्रवृत्तींपासूण परावृत्त करणे गरजेचे आहे. केंद्रशासित प्रदेशामुळे विकासाला वाव आहे. एका वर्षात याचे परिणामदिसतील असे म्हणने योग्य होणार नाही. विकासाठी आपल्याला आणखी काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
-निवृत्त लेफ्टनंट जनरल अता हसनेन

Web Title: Anniversary of section 370 cancelled! Steps have been stop of development In Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.