गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा!
By admin | Published: June 1, 2017 03:06 AM2017-06-01T03:06:35+5:302017-06-01T03:06:35+5:30
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि देशातील बहुसंख्य लोकांचा चरितार्थ शेतीवर चालत असल्याने शेतीसाठी उपयुक्त अशा
जयपूर: भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि देशातील बहुसंख्य लोकांचा चरितार्थ शेतीवर चालत असल्याने शेतीसाठी उपयुक्त अशा गाईचे आणि गोवंशाचे रक्षण करण्यासाठी गाय हा राष्ट्रीय प्राणी घोषित करावा, अशी सूचना राजस्थान उच्च न्यायालयाने बुधवारी केली.
गोहत्येसाठी असलेली शिक्षा वाढवून ती जन्मठेप अशी केली जावी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. न्या. महेश चंद्र शर्मा यांनी बुधवारी सेवानिवृत्त होण्याआधी दिलेल्या १४५ पानी हिंदी निकालपत्रात ही मते व्यक्त केली. सुमारे आठ हजार भेकड आणि बेवारस गायींचा सांभाळ करणाऱ्या जयपूरमधील हिंगोलिया पांजरापोळमध्ये गेल्या वर्षी शंभरहून अधिक गायी मरण पावल्या होत्या. त्यासंबंधीत जनहित याचिकेवर न्या. शर्मा यांनी हे निकालपत्र दिले.
शेजारचे नेपाळ हिंदूराष्ट्र आहे व तेथे गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आहे, असा संदर्भ देत न्या. शर्मा यांनी म्हटले की, भारतातही गोवंशाचे रक्षण करणे हे राज्यघटेननुसार सरकारचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ४८ नुसार गोवंशासह अन्य दुधाळ आणि शेतीयोग्य जनावरांच्या कत्तलीस प्रतिबंध करून त्यांचे वाण सुधारणे व त्यांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. गायीला ‘न्यायिक व्यक्तित्व’ बहाल करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. या अनुषंगाने त्यांनी राजस्थानचे मुख्य सचिव आणि अॅडव्होकेट जनरल यांची गाईंचे ‘कायदेशीर संरक्षक’ म्हणून नेमणूक केली व दोघांनी गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारशी पाठपुरावा करावा, असेहि निर्देश दिले. (वृत्तसंस्था)
न्या. शर्मा यांनी नंतर पत्रकारांशी गप्पा मारताना या निकालपत्राचे विश्लेषण व समर्थन केले.
भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या प्रजननाविषयी धादान्त अवैज्ञानिक सिद्धांत पत्रकारांना सांगितला.
न्या. शर्मा म्हणाले:
जो मोर है, यह आजीवन ब्रह्मचारी है. वह मोरनी के साथ सेक्स नही करता. उसके जो आंसू आते हे, मोरनी उन्हे चुभकर गर्भवती होती है और मोर या मोरनी को जन्म देती है!