सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 5 मार्चपासून सुरू होणार परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 09:40 PM2018-01-10T21:40:30+5:302018-01-10T21:44:26+5:30
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे.
नवी दिल्ली - सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर 12वीची परीक्षा ही 12 एप्रिलपर्यंत चालेल.
Date sheet for examinations of Class 10th & 12th students of Central Board of Secondary Education (CBSE) declared
— ANI (@ANI) January 10, 2018
सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. देशाच्या विविध भागातील विद्यार्थी सीबीएसईचे परीक्षार्थी असल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागलेले असते. आज जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 5 मार्च रोजी सुरू होणार आहे. ही परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालेल. तर 12 वीची परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. 12 वीची परीक्षा 12 एप्रिलपर्यंत चालेल.
Examinations of Class 10th students will commence on 5th March & conclude on 4th April; examinations of Class 12th students will commence on 5th March & conclude on 12th April.
— ANI (@ANI) January 10, 2018