ऐन दिवाळीत जागोजागी कचर्‍याचे ढीग मनपाची अनास्था : ठेक्याच्या घोळामुळे कर्मचारी संख्येचे कारण केले जातेय पुढे

By Admin | Published: November 10, 2015 10:56 PM2015-11-10T22:56:46+5:302015-11-10T22:56:46+5:30

जळगाव : मनपा प्रशासनाच्या अनास्थेमुळेच ऐन दिवाळीत शहरात रस्त्यांवर जागोजागी कचर्‍याचे ढीग पडलेले दिसून येत आहेत. सफाई ठेक्याचा ऐन दिवाळीच्या तोंडावर घातलेल्या घोळामुळे आरोग्य विभागही कर्मचारी संख्येचे कारण पुढे करीत आहे.

Announcement of Due Diligence in the Diwali of Diwali: The reason for the number of employees is due to the dilution of the contract. | ऐन दिवाळीत जागोजागी कचर्‍याचे ढीग मनपाची अनास्था : ठेक्याच्या घोळामुळे कर्मचारी संख्येचे कारण केले जातेय पुढे

ऐन दिवाळीत जागोजागी कचर्‍याचे ढीग मनपाची अनास्था : ठेक्याच्या घोळामुळे कर्मचारी संख्येचे कारण केले जातेय पुढे

googlenewsNext
गाव : मनपा प्रशासनाच्या अनास्थेमुळेच ऐन दिवाळीत शहरात रस्त्यांवर जागोजागी कचर्‍याचे ढीग पडलेले दिसून येत आहेत. सफाई ठेक्याचा ऐन दिवाळीच्या तोंडावर घातलेल्या घोळामुळे आरोग्य विभागही कर्मचारी संख्येचे कारण पुढे करीत आहे.
मनपाकडे ५२४ सफाई कर्मचारी आहेत. त्यातील काही वाहनावर असल्याने उर्वरीत ४८२ कायम सफाई कर्मचार्‍यांच्या मदतीने किमान प्रमुख रस्त्यावरील कचर्‍याचे ढीग उचलणे अशक्य नाही. मात्र आरोग्य विभागाकडून परिस्थितीचा फायदा उचलत सफाई ठेक्याचा घोळ व कर्मचारी संख्येचे कारण पुढे करीत सफाईकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
शहरातून चक्कर मारली असता सर्व प्रमुख रस्त्यांवर कचर्‍याचे ढीग पडलेले दिसून आले. कचरा कुंड्या तुडुंब भरलेल्या असून त्याआजूबाजूला रस्त्यावरदेखील कचर्‍याचे ढीग साचले असल्याचे दिसून आले. म्हणजेच या कचरा कुंड्यातील कचरादेखील उचलला गेलेला नसल्याचे आढळून आले.
रामानंदनगर रस्त्यावर म्युन्सीपल कॉलनी येथे, भजेगल्लीत, सुभाष चौक, घाणेकर चौक, पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारील पोलीस अधिकारी निवासस्थानांजवळ, बी.जे. मार्केटसमोर, बळीराम पेठ, लेवा बोर्डीर्ंग हॉलजवळ, चौघुले प्लॉट, कांचननगर आदी बहुसंख्य भागात कचर्‍याचे ढीग साचलेले दिसून आले.

Web Title: Announcement of Due Diligence in the Diwali of Diwali: The reason for the number of employees is due to the dilution of the contract.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.