निवडणूक आयोगाकडून मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 06:07 PM2019-01-18T18:07:46+5:302019-01-18T18:30:39+5:30
यावर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले असून, त्यांच्याकडून निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - यावर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले असून, त्यांच्याकडून निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाककडून होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेबाबत सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार असून, देशभरात सहा ते सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
Sources: Election Commission of India to announce the 2019 Lok Sabha election schedule in the first week of March, election would be held in 6 to 7 phases
— ANI (@ANI) January 18, 2019