पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2016 03:39 PM2016-03-04T15:39:36+5:302016-03-04T15:56:01+5:30

तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Announcing the state assembly elections in five states | पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

Next
>
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ४ - तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या आहेत. केरळ, पुडूचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्पे आणि आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. या सर्व राज्यांमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. 
 
आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे तर ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये मिळून एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  या निवडणुकांसाठी ७५ ते ८० हजार निमलष्करी जवान तैनात करण्यात येणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार आहेत. मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार आहे.पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे
 
पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रम 
पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार.
 
पुडूचेरीमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार
 
तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार.
 
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १६ मे रोजी एका टप्प्यामध्ये मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार, पहिल्या टप्प्याचे मतदान दोन तारखांना होणार, चार एप्रिल आणि ११ एप्रिल.
 
पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलला दुस-या टप्प्याचे, २१ एप्रिलला तिस-या टप्प्याचे मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये २५ एप्रिलला चौथ्या टप्प्याचे आणि ३० एप्रिलला पाच टप्प्यांचे मतदान होणार.
 
पश्चिम बंगालमध्ये ५ मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान होणार.
 
आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार, पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे, ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार.
 
पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल.
 
प्रत्येक राज्यामध्ये पाच केंद्रीय निरीक्षक निवडणूकीवर लक्ष ठेवतील.
 
मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार.
 
आसाममध्ये १.९८ कोटी मतदार, केरळमध्ये २.५६ कोटी मतदार, तामिऴनाडूत ५.८ कोटी मतदार, पश्चिम बंगालमध्ये ६.५५ कोटी मतदार आणि पुडूचेरीत ९.२७ लाख मतदार.
 
मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार.
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये आदर्श अचारसंहिता लागू.
 
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार - मुख्य निवडणूक आयुक्त.
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये मिळून एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार.
 
 

Web Title: Announcing the state assembly elections in five states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.