बालनिकेतन विद्यामंदीरात वार्षिक पारितोषिक

By Admin | Published: February 5, 2016 12:33 AM2016-02-05T00:33:10+5:302016-02-05T00:33:10+5:30

जळगाव- प्रगती शिक्षण मंडळ संचलित बालनिकेतन विद्यामंदिर या शाळेचा वार्षिक पारितोषिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच झाला. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.युवराज वाणी व सचिव गोवर्धन पाटील व संचालिका प्रा.ललिता वाणी, वसंत चौधरी, मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे व डॉ.रवींद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Annual prize in Balmanyetan Vidyamandir | बालनिकेतन विद्यामंदीरात वार्षिक पारितोषिक

बालनिकेतन विद्यामंदीरात वार्षिक पारितोषिक

googlenewsNext
गाव- प्रगती शिक्षण मंडळ संचलित बालनिकेतन विद्यामंदिर या शाळेचा वार्षिक पारितोषिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच झाला. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.युवराज वाणी व सचिव गोवर्धन पाटील व संचालिका प्रा.ललिता वाणी, वसंत चौधरी, मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे व डॉ.रवींद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले हस्तलिखीत प्रेरणा- अद्भूत वैज्ञानिक माहिती यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले १ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांचे शेतकरी गीत- धरणी आईची माया व इ.५ वी ते ७ वीचे जीवन आपुले सार्थ करा रे, यावर सामूहिक नृत्य सादर केले. प्रसंगी बालवाडी विभागातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत साक्षी देशमुख ज्युनि. बाल तर हेमंत पवार (शिवाजी महाराज), नकुल मेढे (शिक्षक) व रवि विजय पवार (डॉक्टर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विविध क्रीडा स्पर्धांमधील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. वर्तमानपत्रातील कात्रणे चिकटवून संग्रह व‘ा करणार्‍या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस वाटप करण्यात आले.

Web Title: Annual prize in Balmanyetan Vidyamandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.