Corona Vaccine for Animals: प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:37 AM2022-06-10T11:37:58+5:302022-06-10T11:39:30+5:30
Anocovax Vaccine: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली कोरोना व्हॅक्सीन लॉन्च केली आहे.
Anocovax Vaccine: मानवांपाठोपाठ आता प्राण्यांसाठीही कोरोनाची लस (Coronavirus) सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली कोविड लस 'अनोकोव्हॅक्स' (Anocovax) जारी केली. ही लस हरियाणास्थित ICAR-National Research Center on Equines (NRC) ने विकसित केली आहे.
डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांवर परिणामकारक
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ने एका निवेदनात म्हटले आहे की, Anokovax ही प्राण्यांसाठीची कोविड-19 विरोधातील लस आहे. एन्कोव्हॅक्सपासून बनविलेले अँटीबॉडीज कोविड-19 च्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांवर प्रभावी आहेत.
या प्राण्यांसाठी सुरक्षित
निवेदनात म्हटले आहे की, लसीमध्ये कोविड डेल्टा अँटीजन आहे, ज्यात अल्हाइड्रोजेल सहायकाच्या भूमिकेत आहे. ही लस कुत्रा, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे. हे अप्रत्यक्ष ELISA किट आधारित विशेष न्यूक्लियोकॅप्सिड प्रोटीन आहे. हे किट भारतात बनवण्यात आले असून त्यासाठी पेटंटही दाखल करण्यात आले आहे.
ही एक मोठी उपलब्धी
कृषी मंत्री नरेंद्र सिंद तोमर यांनी ICAR-NRC द्वारे प्राण्यांसाठी विकसित केलेली लस आणि डायग्नोस्टिक किट डिजिटली जारी केली. त्यानंतर म्हणाले, 'शास्त्रज्ञांच्या अथक योगदानामुळे देश आयात करण्याऐवजी स्वतःची लस विकसित करण्यात स्वयंपूर्ण झाला आहे. ही खरोखरच मोठी उपलब्धी आहे.'