अनोखा मॉल! कडक्याच्या थंडीत गरीबांसाठी मायेची ऊब; 'या' ठिकाणी मोफत मिळतात स्वेटर, ब्लँकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:43 AM2023-01-24T11:43:23+5:302023-01-24T11:50:48+5:30

कोणीही गरीब माणूस येऊन उबदार कपडे आणि इतर अनेक गोष्टी मोफत घेऊ शकतो.

anokha mall lucknow warm cloths including blankets are free for the poors like rickshaw pullers labourers | अनोखा मॉल! कडक्याच्या थंडीत गरीबांसाठी मायेची ऊब; 'या' ठिकाणी मोफत मिळतात स्वेटर, ब्लँकेट

फोटो - news18 hindi

Next

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊचा अनोखा मॉल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा असा मॉल आहे, जिथे कोणीही गरीब माणूस येऊन उबदार कपडे आणि इतर अनेक गोष्टी मोफत घेऊ शकतो. लोकांनी दान केलेले हे कपडे रिक्षाचालक, मजूर, झोपडपट्टीत राहणारे लोक आणि गरिबांना हिवाळ्याच्या महिन्यांत थंडीशी लढण्यासाठी मदत करतात.

हा अनोखा मॉल' वर्षातील तीन महिने (डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी) चालतो आणि देणगीदारांकडून गोळा केलेले लोकरीचे कपडे गरिबांना देतात. गेल्या पाच वर्षांपासून अशापद्धतीने काम सुरू आहे. हा मॉल चालवणारे डॉ. अहमद रझा खान म्हणाले, "अन्य ठिकाणी आणि प्रसंगी लोकरीचे कपडे गरजूंना वाटले जातात आणि जेथे घेणारे स्वीकारण्यास संकोच करतात."

"लोकरीचे कपडे खरेदी करू इच्छिणारी व्यक्ती एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी जात असल्याप्रमाणे अनोख्या मॉलमध्ये प्रवेश करू शकते आणि त्याच्या आवडीचे कपडे, बूट इत्यादी घेऊ शकतात." खान यांच्या म्हणण्यानुसार, अनोख्या मॉलमध्ये देणगीदारांची तसेच कपडे, शूज इत्यादींची योग्य नोंद ठेवली जाते. 

'गरजूंना मदत करणाऱ्या या मॉलचा कोणीही अवाजवी फायदा घेऊ नये म्हणून हे केले जाते. पूर्वी काही लोक येथून कपडे घेऊन बाजारात विकायचे. खान यांच्या म्हणण्यानुसार, अनोखा मॉलमध्ये गरिबांसाठी कपडे, सँडल, सुटकेस, शालेय गणवेश, ब्लँकेट देखील उपलब्ध करून दिली जात आहे. दान करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त डॉक्टरांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: anokha mall lucknow warm cloths including blankets are free for the poors like rickshaw pullers labourers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.