शहरी गरिबांसाठी आणखी १.५ लाख घरांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:05 AM2018-06-01T05:05:01+5:302018-06-01T05:05:01+5:30
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १५ शहरांमध्ये १३,५०६ घरांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १५ शहरांमध्ये १३,५०६ घरांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात ६४३ कोटींची गुंतवणूक असून शहरी गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचा (शहरी) हा प्रकल्प एक भाग आहे.
महाराष्ट्रात या प्रकल्पावर ६४३ कोटी खर्च केले जाणार आहेत त्यात केंद्राकडून २०१ कोटींचे साह्य मिळेल. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने पीएमएवायअंतर्गत शहरी गरिबांसाठी आणखी १.५ लाख परवडणाºया घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली. त्यासाठी ७ हजार २२७ कोटींची गुंतवणूक होईल. यासाठी केंद्र सरकारकडून २ हजार २०९ कोटी रुपयांचे साह्य मिळणार आहे.
नियोजित घरांच्या संख्येसह पीएमएवाय अंतर्गत (यु) एकूण घरे
४७,५२,७५१ इतकी होतील.
राज्य एकूण शहरे गुंतवणूक घरे
आंध्र प्रदेश २२ ३,१८४ कोटी ५६,५१२
उत्तर प्रदेश ११० ८७० कोटी २३,००६
मध्य प्रदेश ३२ ७३० कोटी १७,९२०
झारखंड २६ १,०७५ कोटी १४,५२६
छत्तीसगढ ६१ २३४ कोटी ७,६१५
राजस्थान ३० २८५ कोटी ६,५७६
ओडिशा २० १४५ कोटी ४,८४९
पंजाब ४८ ७१ कोटी १,९०९
आसाम ६ ३९ कोटी १,५२०