हेरगिरीत आणखी ५ बडे मासे गळाला!

By admin | Published: February 21, 2015 04:05 AM2015-02-21T04:05:34+5:302015-02-21T04:05:34+5:30

पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरणात शुक्रवारी रात्री आणखी ५ बडे मासे गळाला लागले असून हे पाचही बड्या कंपन्याचे अधिकारी आहेत.

Another 5 big fish in the head! | हेरगिरीत आणखी ५ बडे मासे गळाला!

हेरगिरीत आणखी ५ बडे मासे गळाला!

Next

नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरणात शुक्रवारी रात्री आणखी ५ बडे मासे गळाला लागले असून हे पाचही बड्या कंपन्याचे अधिकारी आहेत. या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना जेरबंद करण्यात आले आहे. कार्पोरेट हेरगिरी प्रकरणी राजधानी दिल्ली हादरलेली असतानाच हे पाच जण पोलिसांच्या हाती लागले. अटक करण्यात आलेले अधिकारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स अनिल धीरुभाऊ अंबानी समूह, एस्सार, केयर्न्स आणि इतर कंपन्याशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हेरगिरी प्रकरणातील आरोपींकडे वित्त, कोळसा आणि ऊर्जा मंत्रालयातील गोपनीय दस्तावेजासह अर्थमंत्र्याच्या आगामी अर्थसंकल्पीय भाषणातील काही अंशही आढळले आहेत. अटक करण्यात आलेल्यांत शैलैश सक्सेना (आरआयएल), विनय कुमार (एस्सार), के. के. नाईक (केयर्न्स), सुभाष चंद्र (ज्युब्लिएंट एनर्जी), ऋषी आनंद (रिलायन्स एडीएजी) यांचा समावेश आहे. अटक करणाऱ्यांत आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या तीन डायऱ्यांतून हे गुपित उघड झाले. या डायऱ्यांत अनेक महत्त्वाची नावे व नंबर्स असण्याची शक्यता आहे. या आरोपींकडे इतर मंत्रालयातील गोपनीय दस्तावेज असल्याचे संकेत गुन्हा अन्वेषण विभागाच्या चौकशीतून मिळतात. या प्रकरणात इतरांचाही समावेश आहे का? याचा छडा लावण्यासाठी पोलिस चौकशी करणार आहेत.

चौकशी पूर्ण होऊ द्या...
च्दोषींवर कारवाई झाली पाहिजे,असे सांगत पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान म्हणाले की, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया देईल. चौकशी पूर्ण होई द्या. कोणाचीही गय केली जाणार नाही.
 आरोपींना पोलिस कोठडी...
च्दिल्ली कोर्टाने ७ पैकी ४ आरोपींना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शंतनु सैकिया, प्रयास जैन, राकेश कुमार आणि ललटा प्रसाद यांंची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
च्उर्वरित आशाराम, ईश्वर सिंग आणि राजकुमार चौबे यांना १४ दिवसांची न्यायालयी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Another 5 big fish in the head!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.