मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिफ्ट; स्वस्तात पूर्ण होणार घराचं स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 05:41 PM2022-04-13T17:41:32+5:302022-04-13T17:42:24+5:30

मोदी सरकार ने या कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी, घर अथवा फ्लॅट विकत घेण्यासाठी अथवा बँकांकडून घेतलेले होम लोन परत करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अ‍ॅडव्हान्सच्या व्याजदरात 80 बेसिस प्वाइंट अर्था 0.8 टक्क्यांची कपात केली आहे. ही कपात 1 एप्रिल, 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

Another big gift from the Modi government to employees; now Central government employees can avail house building advance at a lower interest rate | मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिफ्ट; स्वस्तात पूर्ण होणार घराचं स्वप्न!

मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिफ्ट; स्वस्तात पूर्ण होणार घराचं स्वप्न!

Next

नवी दिल्ली - एकीकडे महागाईमुळ सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. वाढत्या महागाईपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने गेल्या महिन्यातच महागाई भत्ता वाढवला होता. तर आता, मोदी सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मोदी सरकार ने या कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी, घर अथवा फ्लॅट विकत घेण्यासाठी अथवा बँकांकडून घेतलेले होम लोन परत करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अ‍ॅडव्हान्सच्या व्याजदरात 80 बेसिस प्वाइंट अर्था 0.8 टक्क्यांची कपात केली आहे. ही कपात 1 एप्रिल, 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

7.1 टक्के व्याज दराने मिळणार अ‍ॅडव्हान्स
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ऑफिस मेमोरेंडममध्ये अ‍ॅडव्हान्सच्या व्याजदरात कपातीची माहिती देण्यात आली आहे. यानुसार, आता 31 मार्च, 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7.1 टक्के वार्षिक व्याजदराने अ‍ॅडव्हान्स पैसे मिळू शकतात. यापूर्वी हा दर 7.9 टक्के होता.

25 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅडव्हान्स मिळू शकते - 
7 व्या वेतन आयोगाची शिफासर आणि हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (HBA) नियम 2017 नुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना, घर बांधण्यासाठी अथवा खरेदी करण्यासाठी दिले जाणारे अ‍ॅडव्हान्स सरळ व्याज दराने दिले जाते. तर बँक चक्रवाढ व्याजाने होम लोन देते. या नियमानुसार, केंद्रीय कर्मचारी आपल्या मुळ पगारानुसार 34 महिन्यांपर्यंत अथवा जास्तीत जास्त 25 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅडव्हन्स घेऊ शकतात. याशिवाय, घराची किंमत अथवा परत फेडीची क्षमता यांपैकी जे कमी असेल तेवढे पैसे अॅडव्हान्सच्या स्वरुपात घेऊ शकतात.

बँकेचे होम लोनही अ‍ॅडव्हान्सने चुकवता येईल - 
घर बांधण्यासाठी, घर घेण्यासाठी अथवा फ्लॅट घेण्यासाठी बँकेकडून घेतलेले होम लोनही केंद्रीय कर्मचारी अ‍ॅडव्हान्स घेऊन फेडू शकतात. हे अ‍ॅडव्हान्स कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना मिळेल. मात्र, तात्पूरत्या स्वरुपात असलेल्या कर्मचाऱ्यांची नौकरी सल पाच वर्षांची असायला हवी. महत्वाचे म्हणजे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना, त्यांनी ज्या दिवसापासून बँक अथवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून लोन घेतले असेल, त्याच दिवसापासून अ‍ॅडव्हान्स मिळेल. बँक-रीपेमेंटसाठी अ‍ॅडव्हान्स जारी झाल्यानंतर एका महिन्याच्या आत HBA Utilization Certificate जमा करावे लागेल.

Web Title: Another big gift from the Modi government to employees; now Central government employees can avail house building advance at a lower interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.