बीफ बॅन विरोधात आणखी एका भाजपा नेत्याचा राजीनामा
By Admin | Published: June 6, 2017 12:50 PM2017-06-06T12:50:09+5:302017-06-06T13:08:15+5:30
बीफ बॅनला विरोध दर्शविण्यासाठी मेघालय भाजपमधील आणखी एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
तुरा, दि. 6- गोमांस विक्री, अवैध कत्तलखान्यांविरोधात मेघालय भाजपामधील आणखी एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मेघालयातील नॉर्थ गारो हिल्सचे भाजपाचे अध्यक्ष बाचू माराक यांनी पक्षाकडे आपला राजीनामा दिला आहे. वेस्ट गारो हिल्सचे जिल्हाध्यक्ष बर्नार्डर माराक यांनी बीफ बॅनला विरोध करण्यासाठी राजीनामा दिला होता त्याचवेळी बाचू यांनीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी रात्री बाचू यांनी राजीनामा दिला आहे.
"गारोमधील लोकांच्या भावनांसोबत मी तडजोड करू शकत नाही. या जिल्ह्याचा नागरीक असल्याने येथिल लोकांच्या हिताचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. बीफ खाणं आमची संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. भाजपची बेकायदेशीर विचारसरणी आम्ही स्विकारणार नाही", असं मत बाचू माराक यांनी व्यक्त केलं आहे.
बाचू माराक यांनी भाजपाचे प्रदेश युनिट अध्यक्ष शिबुन लिंगदोह यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. नुकतंच मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गारो हिल्समध्ये बीफ पार्टीचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर भाजपा पक्षातून तीव्र टीका झाली होती. भाजपाचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी बाचू यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिला होता. भाजपचे नेते बाचू यांनी फेसबुकवरून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.
"माझी परंपरा आणि संस्कृती हे माझ्यासाठी प्राधान्य आहे, पक्ष सगळ्यात शेवटी येतो. प्रत्येक वेळी बीफचा मुद्दा का उचलला जातो ? इतर पशुंबदद्ल का बोललं जात नाही, असा सवालही त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला होता. बर्नार्ड मराक या माजी भाजपा नेत्याने 10 जून रोजी तुराच्या ईडनबारीमध्ये बीफ पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीच बाचू सहभागी होण्याची शक्यता आहे.
I resigned from BJP as they are dishonouring my culture. This is an anti-Christian party: Bachu Marak #Meghalayapic.twitter.com/hOlQxFYRbL
— ANI (@ANI_news) June 6, 2017