गडचिरोलीत मोठी चकमक, पोलिसांकडून 13 नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:00 AM2021-05-21T09:00:43+5:302021-05-21T09:32:45+5:30
गडचिरोलीच्या एटापल्ली जंगल परिसरातून कमीत कमी 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गडचिरोली - राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी, 8 जणांचे मृतदेह जंगलातून ताब्यात घेण्यात आले आहेत.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलवाद्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत शुक्रवारी सकाळी तब्बल 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे. याशिवाय काही जखमीही झाले आहेत. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली. पोलिसांचे सी-60 पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ही चकमक उडाली. जंगल परिसरातून अद्याप 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
Maharashtra: Bodies of at least six Naxals recovered in the forest area of Etapalli, Gadchiroli in an ongoing encounter between the C-60 unit of Maharashtra Police and Naxals. More details awaited.
— ANI (@ANI) May 21, 2021
एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर हल्ला
नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला केला होता. या ग्रॅनाईटचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जात आहे. पोलीस स्टेशन पर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागणार आहे. त्यात, पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.