व्यापमं घोटाळ्यातील आणखी एकाचा मृत्यू

By admin | Published: May 9, 2015 12:06 AM2015-05-09T00:06:54+5:302015-05-09T00:06:54+5:30

मध्यप्रदेशातील गाजलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील आणखी एका आरोपीचा रहस्यमय मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे

Another death of business scandal | व्यापमं घोटाळ्यातील आणखी एकाचा मृत्यू

व्यापमं घोटाळ्यातील आणखी एकाचा मृत्यू

Next

भोपाळ : मध्यप्रदेशातील गाजलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील आणखी एका आरोपीचा रहस्यमय मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे. मृत आरोपीचे नाव विजयसिंग असून, तो रिवा जिल्ह्यातील राहणारा आणि शाजापूरच्या जिल्हा कारागृहात फार्मासिस्ट पदावर कार्यरत होता. विजयसिंग हा व्यापमं घोटाळ्यात रहस्यमय मृत्यू झालेला आठवा आरोपी आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये मध्यप्रदेशच्या राज्यपालांचा मुलगा शैलेश यादव याचाही समावेश आहे. दरम्यान, सिंगच्या भावाने या रहस्यमय मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयसिंगचा मृतदेह गेल्या २८ एप्रिलला छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील एका लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत आढळला. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) व्यापमं घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो निलंबित होता. एका प्रकरणात त्याला सोडण्यातही आले होते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर १७ एप्रिलला त्याला एसटीएफने पाचारण केले होते. मृत विजयसिंगचा भाऊ अभयसिंग यांनी अलाहाबादजवळील उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील शंकरगड येथून दूरध्वनीवर बोलताना सांगितले की, विजयसिंगचा मृतदेह लॉजच्या ज्या खोलीत आढळला तेथे कुठलाही विषारी पदार्थ सापडलेला नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरात विष आढळून आल्याचे नमूद आहे. पोलिसांना खोलीतून मृत्यूपूर्वी लिहिलेले काही पत्रही मिळालेले नाही.

 

Web Title: Another death of business scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.