युपीत आणखी एका नेत्याची हत्या

By admin | Published: June 11, 2014 01:09 AM2014-06-11T01:09:34+5:302014-06-11T01:09:34+5:30

मुजफ्फरनगरच्या मीरपूर भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेते ओमवीर सिंग यांची गोळी झाडून हत्या केली आहे.

Another leader killed in UP | युपीत आणखी एका नेत्याची हत्या

युपीत आणखी एका नेत्याची हत्या

Next
>मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या दादरी भागात भारतीय जनता पक्षाचे नेते विजय पंडित यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच मुजफ्फरनगरच्या मीरपूर भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेते ओमवीर सिंग यांची गोळी झाडून हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबी कॉलनीतील रहिवासी असलेले भाजपा नेते व माजी सैनिक ओमवीर सिंग हे मोटरसायकलवरून आपल्या शेतात पाणी देण्यासाठी जात होते. वाटेत नंगला चौपड गावात त्यांना काही गुंडांनी लुटण्याच्या इराद्याने रोखले असता त्यांनी विरोध केला. या गुंडांनी त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला ज्यात त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर त्यांचा मोबाईल व पिस्तुल घेऊन फरार झाले. 
या हत्येच्या विरोधात शेतक:यांनी त्यांचा मृतदेह गावाच्या वेशीवर ठेवून धरणो दिले. पोलीस अधीक्षक मुकेश चंद्र मिश्र यांनी गावक:यांची समजूत घातली व त्यांना परत पाठविले. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 
सलग दोन हत्त्यांमुळे उत्तर प्रदेशातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (वृत्तसंस्था)
 
अखिलेश सरकार बडतर्फ करा -बसपा
-नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा आरोप करीत बहुजन समाज पार्टीच्या सदस्यांनी(बसपा) आज मंगळवारी राज्यातील अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीचे सरकार बडतर्फ करण्याची मागणी राज्यसभेत लावून धरली़ या मागणीसाठी बसपा सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घालत सभात्याग केला़
-कामकाज सुरू होताच, हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्हय़ाच्या बियास नदीत वाहून गेलेल्या 24 विद्याथ्र्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा होणार होती़ तथापि, मायावतींनी आक्रमकपणो उत्तर प्रदेशचा मुद्दा लावून धरला़ तथापि कुठलेही आश्वासन न मिळाल्याने बसपा सदस्यांनी सभात्याग केला़ 
 

Web Title: Another leader killed in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.