DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:01 PM2024-11-14T23:01:35+5:302024-11-14T23:03:29+5:30
या चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचुकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षण द्वारे करण्यात आले आहे.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) गाइडेड पिनाका वेपन सिस्टिमची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये तीन टप्प्यांत चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांदरम्यान अनेक लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी रेंज, अचुकता आणि स्थिरतेचे मूल्यांकन रॉकेट्सच्या व्यापक परीक्षण द्वारे करण्यात आले आहे.
पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम प्रिसाइज स्ट्राइक व्हेरियंट ही पूर्णपणे स्वदेशी शस्त्र प्रणाली आहे. जी संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, युद्धसामग्रीसह प्रमाण आणि प्रायोगिक अस्थापना यांच्या सहकार्याने, आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने डिझाइन आणि विकसित केले आहे. या चाचण्यांदरम्यान, प्रत्येक उत्पादन एजन्सीकडून एकूण 12 रॉकेट, पिनाका लॉन्चरच्या टू इन-सर्व्हिस व्हर्जनने फायर करण्यात आले.
यासंदर्भात, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रणालीच्या यशस्वी चाचण्यांबद्दल DRDO आणि लष्कराचे कौतुक केले आहे. तसेच, ही गाइडेड पिनाका शस्त्रास्त्र प्रणालीच्या समावेशामुळे सशस्त्र दलांच्या तोफखान्याची मारकक्षमता आणखी चांगली होईल, असे म्हटले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनीही चाचण्यांशी संबंधित टीमचे अभिनंदन केले आणि ही रॉकेट प्रणालीने भारतीय सैन्यात सामील होण्यापूर्वी सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या असल्याचे म्हटले आहे.