आपच्या आणखी एका आमदाराला अटक
By admin | Published: August 1, 2016 01:41 AM2016-08-01T01:41:42+5:302016-08-01T01:41:42+5:30
आम आदमी पार्टीच्या एका महिला कार्यकर्त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आपचे नरेलाचे आमदार शरद चौहान यांना अटक केली
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या एका महिला कार्यकर्त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आपचे नरेलाचे आमदार शरद चौहान यांना अटक केली आहे. चौहान यांच्या अटकेने आपच्या अटक करण्यात आलेल्या नेत्यांची संख्या १२ झाली.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गत चार दिवसात
चौहान आणि मुख्य आरोपी रमेश भारव्दाज यांची काही तास चौकशी केली होती. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, चौहान आणि भारव्दाज यांच्याशिवाय आमदारांचे सहकारी अमित आणि रजनीकांतसह अन्य पाच जणांना शनिवारी अटक करण्यात आली. भारव्दाज यांना सोनीपतहून २६ जुलैला अटक करण्यात आली होती.
>व्हिडिओ रेकॉर्डिंग
या महिलेने एका व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये भारव्दाजवर गंभीर आरोप केले होते. भारव्दाजने आपल्याला म्हटले होते की, जर पक्षात प्रगती करायची असेल तर तुला तडजोड करावी लागेल. स्थानिक आमदारांच्या आपण जवळचे असल्याचे त्याने सांगितले होते, असा आरोप तिने केला होता.