आपच्या आणखी एका आमदारास दिल्लीत अटक

By admin | Published: June 26, 2016 02:35 AM2016-06-26T02:35:06+5:302016-06-26T02:35:06+5:30

आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असता

Another one of your MLAs arrested in Delhi | आपच्या आणखी एका आमदारास दिल्लीत अटक

आपच्या आणखी एका आमदारास दिल्लीत अटक

Next

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असतानाच अटक केली.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कारवाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी यांनी राजधानी दिल्लीत आणीबाणी लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष असलेले मोहनिया यांना एका पोलीस अधिकाऱ्याने दुपारी १२.१ वाजताच्या सुमारास दक्षिण दिल्लीच्या खानपूर येथील त्यांच्या कार्यालयातून अक्षरश: खेचून बाहेर काढले. त्या वेळी ते एक पत्रपरिषद घेत होते. दक्षिण पूर्वचे संयुक्त पोलीस आयुक्त आर.पी. उपाध्याय यांनी सांगितले की, मोहनिया यांच्यावर भादंविच्या ३२३ (जाणूनबुजून नुकसान पोहोचविले), ५०६ (धमकी देणे), ५०९ (महिलेचा विनयभंग), ३५४ (विनयभंगाच्या हेतूने महिलेसोबत बळजबरी), ३५४ ए (लैंगिक अत्याचार) आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संगम विहार क्षेत्राचे आमदार असलेले मोहनिया यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मोदी यांनी दिल्लीत आणीबाणी जाहीर केली आहे. दिल्लीच्या जनतेने ज्यांना निवडले त्यांना अटक केली जात आहे. त्यांच्यावर धाडी घालणे, दहशत निर्माण करणे आणि खोटे गुन्हे नोंदविण्याचे सत्र सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
दिनेश मोहनिया यांना वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमक्ष पत्रकार परिषदेत अटक करून मोदींना काय संदेश द्यायचा आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. फेब्रुवारी २०१५मध्ये दिल्लीत आपचे सरकार आरूढ झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी
अटक केलेले मोहनिया हे आपचे आठवे आमदार आहेत. आ. दिनेश मोहनिया यांना अटकेनंतर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्यांच्या वकिलांनी आ. मोहनिया यांना जामीन मिळावा, अशी विनंती केली. मात्र त्यांना सोमवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

काय आहे प्रकरण
- गेल्या २३ जूनला महिलांच्या एका गटाने मोहनिया यांच्याविरोधात नेबसराय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
- २२ जूनला या महिला पाण्याच्या समस्येवरून तक्रार करण्याकरिता मोहनिया यांच्याकडे गेल्या होत्या.
त्या वेळी बाचाबाची झाली आणि आमदारांनी छेडखानी केल्याचा आरोप आहे. मोहनिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.

माझ्यावरील आरोप निराधार : आ. मोहनिया यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
मी पोलीस तपासात सहकार्य करण्यास तयार आहे; पण माझ्यावरील आरोप निराधार आहेत, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Another one of your MLAs arrested in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.