बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत CBIने भाजप आमदाराच्या मुलीची केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:13 PM2022-08-01T21:13:19+5:302022-08-01T21:21:48+5:30

Another recruitment scam in Bengal : बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी आधीच सुरू आहे. यामध्ये ईडीने टीएमसी नेते आणि राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे.

Another recruitment scam in Bengal! CBI interrogates daughter of BJP MLA regarding AIIMS recruitment | बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत CBIने भाजप आमदाराच्या मुलीची केली चौकशी

बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत CBIने भाजप आमदाराच्या मुलीची केली चौकशी

Next

पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारही ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे. तिकडे CID ने कल्याणी AIIMS (AIIMS, Kalyani) मधील भरतीसंदर्भात तपास तीव्र केला आहे. या प्रकरणी सीआयडीने आज भाजप आमदार निलाद्री शेखर दाना यांच्या मुलीची अनेक तास चौकशी केली.

बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी आधीच सुरू आहे. यामध्ये ईडीने टीएमसी नेते आणि राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे.

कल्याणी एम्समधील भरतीचे प्रकरण काय आहे?
बांकुरा येथील भाजप आमदार निलाद्री शेखर यांच्यावर आपल्या प्रभावाने मुलगी मैत्री दानाला कल्याणी एम्समध्ये नोकरी मिळवून दिल्याचा आरोप आहे. सीआयडीच्या 4 अधिकाऱ्यांनी आज बांकुरा येथील निलाद्री शेखरच्या घरी पोहोचून बराच वेळ चौकशी केली.

याप्रकरणी महिनाभरापूर्वी कल्याणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपानुसार, कल्याणी एम्समध्ये भरतीदरम्यान घोटाळा झाला होता आणि सीआयडीने तपास हाती घेताच गेल्या आठवड्यात नादियातील चकडा येथील भाजप आमदार बंकिम घोष यांची सून अनुसया घोष धर हिची चौकशी केली होती. 

या प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांवर आपल्या प्रभावाचा वापर करून नातेवाईकांना कल्याणी एम्समध्ये नोकरी मिळवून दिल्याचा आरोप होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये एकूण 8 जणांची नावे आहेत. हा एफआयआर 20 मे रोजी नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात, आयपीसी कलम 420 (फसवणूक), 406, 120-बी (गुन्हेगारी कट) इत्यादी अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. आमदार निलाद्री यांच्या मुलीला डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून ३० हजार रुपये प्रति महिना पगाराची नोकरी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर ती परीक्षा द्यायलाही गेली नव्हती.

Web Title: Another recruitment scam in Bengal! CBI interrogates daughter of BJP MLA regarding AIIMS recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.