आणखी एक सावजी ढोलकिया! दसऱ्यालाच कर्मचाऱ्यांना दिल्या मर्सिडीज, इनोव्हा, क्रेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 01:15 PM2024-10-14T13:15:23+5:302024-10-14T13:16:29+5:30
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ९ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. ९ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कंपन्यांना कार आणि सात वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाईक देण्यात आली आहे.
गुजरातचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया सर्वांच्या परिचयाचे आहेत. ते दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट, आलिशान कार, बाईक आदी गोष्टी भेट देतात. तसाच एक उद्योगपती चेन्नईला आहे. या उद्योगपतीने दसऱ्यालाच आपल्या कर्मचाऱ्यांना २८ कार आणि ७४ बाईक गिफ्ट दिल्या आहेत.
ही एक स्ट्रक्चरल डिझाईन कंपनी आहे, याकंपनीने कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची स्तुती करत ही भेट दिली आहे. यामध्ये इनोव्हा, एक्स्टर, क्रेटा, आय २०, मर्सिडीज बेंझ, ब्रेझा व अर्टिगा या कार आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ९ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. ९ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कंपन्यांना कार आणि सात वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाईक देण्यात आली आहे. कंपनीचे मालक श्रीधर कन्नन यांनी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला निमंत्रण दिले होते. त्यांनी म्हटले की, २००५ मध्ये कंपनीची सुरुवात केवळ ४ कर्मचाऱ्यांनी झाली होती. आता दोन साईटवर १८० कर्मचारी काम करत आहेत.
हे सर्व काम करणारे कर्मचारी हे ग्रामीण भागातील आहेत. आमच्याकडे काम करून त्यांचे आयुष्यात सुधारणा झाली आहे. यामुळे आम्ही त्यांना बाईक आणि कार देऊन त्यांचे जीवनमान आणखी चांगले करत आहोत. हे लोक अनेक वर्षांपासून माझ्यासोबत काम करत आहेत. माझ्यावर व कंपनीवर विश्वास ठेवला आहे. यामुळे मी कर्मचाऱ्यांच्या लग्नातही त्यांना ५० हजार रुपये मदत म्हणून देतो. या वर्षी ती वाढवून एक लाख केलेली आहे, असे कन्नम म्हणाले.