आणखी एका टार्गेट किलिंगने काश्मीर हादरले; बँक व्यवस्थापकाची शाखेतच गाेळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:45 AM2022-06-03T07:45:06+5:302022-06-03T07:45:14+5:30

तीन दिवसांत दुसरी हत्या

Another target killing shook Kashmir; Bank manager stabbed to death in branch | आणखी एका टार्गेट किलिंगने काश्मीर हादरले; बँक व्यवस्थापकाची शाखेतच गाेळ्या घालून हत्या

आणखी एका टार्गेट किलिंगने काश्मीर हादरले; बँक व्यवस्थापकाची शाखेतच गाेळ्या घालून हत्या

Next

- सुरेश डुग्गर

श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यात बँकेत घुसून बँक व्यवस्थापकाची दिवसाढवळ्या गाेळ्या घालून हत्या केली. तीन दिवसांमध्ये हे दुसरे टार्गेट किलिंग आहे. दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेची मंगळवारी शाळेतच हत्या केली हाेती. या घटनांमुळे काश्मीर खाेऱ्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. 

मूळचे राजस्थानच्या हनुमानगड येथील रहिवासी असलेले विजय कुमार हे अरेह माेहनपाेरा येथे इलाकी ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक हाेते. आठवडाभरापूर्वीच त्यांनी या शाखेत पदभार स्वीकारला हाेता. त्यापूर्वी ते भारतीय स्टेट बँक आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या संयुक्त नियंत्रणातील बँकेच्या काेकरनाग शाखेत व्यवस्थापक हाेते.

सकाळी १० च्या सुमारास बँकेमध्ये एक दहशतवादी शिरला. त्याने आजूबाजूला पाहून विजय कुमार यांच्यावर गाेळ्या झाडल्या. विजय यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या हत्येबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. काश्मीरमध्ये नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात केंद्र सरकार अयशस्वी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. 

सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दहशत
शेकडाे सरकारी कर्मचाऱ्यांनी माेर्चा काढून आपापल्या मूळ जिल्ह्यात तातडीने बदली करण्याची मागणी केली. अनेकांच्या हाती रजनी बाला यांचे छायाचित्र हाेते. हत्येच्या वाढत्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली असून, १५ वर्षांपासून जेथे काम करीत हाेताे, तेथे परत पाठविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महिनाभरातील सहावे टार्गेट किलिंग

  • २ जून : बँक व्यवस्थापक विजय कुमार 
  • ३१ मे : शिक्षिका रजनी बाला  
  • २५ मे : टीव्ही कलाकार आमरिन भट
  • २४ मे : पाेलीस कर्मचारी सैफुल्लाह कादरी
  • १३ मे : पाेलीस कर्मचारी रियाज ठाकाेर 
  • १२ मे : सरकारी कर्मचारी राहुल भट 

 

Web Title: Another target killing shook Kashmir; Bank manager stabbed to death in branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.