'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 10:42 AM2020-02-22T10:42:50+5:302020-02-22T10:47:16+5:30

Asaduddin Owaisi : अमुल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं. मी तिला अनेकवेळा आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

Another video of amulya leona who given Pro Pakistan Slogen on Owaisi stage in Bengaluru | 'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर... 

'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर... 

Next
ठळक मुद्देअमुल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं, वडिलांचा संताप बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे सीएएविरोधात रॅलीत दिली होती पाकिस्तान झिंदाबादची घोषणामी जे बोलते आणि करते त्यांच्यामागे बरेच लोक काम करत आहेत

बंगळुरु - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आयोजित केलेल्या रॅलीत पाकिस्तान झिंदाबाद असा नारा लावणाऱ्या अमुल्या लियोनबाबत सोशल मीडियात वादंग सुरु आहेत. नेटकऱ्यांकडून अमूल्या लोयोनला पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला जात आहे. तर गुरुवारी रात्री काही अज्ञात लोकांनी तिच्या घरावर हल्ला करुन खिडक्यांच्या काचा तोडल्या. यातच या मुलीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओ ती म्हणते की, मी एकटी नाही, मी जे बोलते आणि करते त्यांच्यामागे बरेच लोक काम करत आहेत. मी फक्त एक चेहरा आहे. मात्र हा व्हिडिओ 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणेपूर्वीचा आहे. अमुल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनाही टार्गेट करण्यात येत आहे. 

'आज मी जे काही करत आहे ते मी करत नाही. मी फक्त चेहरा बनली आहे यासाठी मीडियाचे आभारी आहे. परंतु माझ्यामागे अनेक सल्लागार समित्या काम करतात, ते लोक जे सल्ला देतात की, आज तुम्हाला भाषणात हे बोलायचं आहे, हे मुद्दे आहेत, लिखाण सामग्रीवर काम केलं जातं, बरेच ज्येष्ठ कार्यकर्ते काम करतात. माझे आई-वडिल सांगतात, हे कसे बोलायचे आहे, असं करावे लागेल, येथे जावे लागेल. हा खूप मोठा विद्यार्थी ग्रुप आहे. बंगळुरू स्टूडंट अलायन्स या सर्व निषेध आंदोलनामागे कार्यरत आहे. मी फक्त त्याचा चेहरा आहे, परंतु बंगळुरू स्टूडंट अलायन्स प्रचंड मेहनत घेत आहे असं अमुल्या लोयोन व्हिडिओत म्हणतेय. 

अमुल्या लियोनचे वडील संतप्त 
अमुल्याचे लोयोनाचे वडिल म्हणाले की, अमुल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं. मी तिला अनेकवेळा आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र अमुल्याने माझं काही ऐकलं नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या मुलीला तुरुंगात पडून राहू द्या. पोलिसांना जर योग्य वाटत असेल तर अमुल्याचे पायही तोडून टाका असं म्हणत तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.

औवेसी बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे सीएएविरोधात रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी तेथे अमुल्या देखील उपस्थित होती. कार्यक्रमाच्या मध्यभागी अमुल्या स्टेजवर पोहोचली आणि माईकवर पाकिस्तान झिंदाबाद घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी औवेसी स्वत: या अमुल्यला रोखण्यास सरसावले त्यानंतर तिने 'हिंदुस्थान झिंदाबाद' अशी घोषणाबाजी सुरू केली मात्र या घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

तिचे पाय तोडलेत तरी चालेल; 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणाऱ्या तरुणीच्या वडिलांचा उद्वेग

नवाब मलिकांच्या 'त्या' व्हिडिओवरुन शिवप्रेमींमध्ये संताप; मनसेनेही विचारला राष्ट्रवादीला सवाल

अधिकृत ट्रस्टशिवाय इतर ट्रस्टना रामलल्लाच्या नावे दान किंवा वर्गणी गोळा करण्यास मज्जाव

इंदोरीकर महाराजांचा 'हा' व्हिडिओ बघाच; मनसेचा तृप्ती देसाईंना टोला

वारिस पठाण यांची बोलती ओवेसींनी केली पूर्ण बंद

Web Title: Another video of amulya leona who given Pro Pakistan Slogen on Owaisi stage in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.