मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ आला समोर; दोघंजण येतात अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:18 PM2022-11-23T12:18:31+5:302022-11-23T12:22:07+5:30

दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Another video of Delhi government minister and Aam Aadmi Party leader Satyendar Jain from jail has gone viral. | मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ आला समोर; दोघंजण येतात अन्...

मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ आला समोर; दोघंजण येतात अन्...

Next

नवी दिल्ली- दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांचा काही दिवसांपूर्वी जेलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये खुर्चीवर बसून सत्येंद्र जैन डोक्याची आणि पायाची मालिश करून घेताना दिसून येत होते. मात्र आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. 

भाजपाचे नेते शहजाद जय हिंद यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.  यामध्ये सत्येंद्र जैन यांची फिजिओथेरपी झाल्यानंतर आता ते तुरुंगात चविष्ट आणि उत्तर दर्जाच्या भोजनाचा आनंद घेत आहेत. एका रिसॉर्टमध्ये सहलीला आल्यासारखा आनंद सत्येंद्र जैन तुरुंगात घेत आहे, अशी टीका शहजाद जय हिंद यांनी केली आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती त्यांना भोजन देण्यासाठी येतात, असं दिसून येत आहे. विशेष म्हणजे न्यायालयात सत्येंद्र जैन यांनी गेल्या ६ महिन्यांपासून अन्नाचा एक कणही खाल्ला नसल्याचा दावा केला होता. 

सत्येंद्र जैन हे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या ६ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते तुरुंगात फिजिओथेरपी घेत होते, असा दावा आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे. 

कथित व्हिडीओमध्ये जैन त्यांच्या सेलमध्ये पाठीमागे आणि पायाची मालिश करताना, काही कागदपत्रे वाचताना आणि बेडवर झोपताना पाहुण्यांशी बोलताना दिसत होते. मिनरल वॉटरच्या बाटल्या आणि रिमोटही दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये ते खुर्चीवर बसून डोक्याची मालिश करून घेताना दिसतात. 
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Another video of Delhi government minister and Aam Aadmi Party leader Satyendar Jain from jail has gone viral.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.