अन्सारी, सोनिया गांधी, केजरीवाल, बेदी मतदान करणाऱ्यांत आघाडीवर
By admin | Published: February 8, 2015 01:21 AM2015-02-08T01:21:48+5:302015-02-08T01:21:48+5:30
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आपचे नेते अरविंद केजरीवाल, भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा समावेश होता.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी अगदी सकाळी सकाळी मतदान करणाऱ्यांमध्ये उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आपचे नेते अरविंद केजरीवाल, भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा समावेश होता.
किरण बेदी यांनी मालवीयनगरमधील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर लोकांना मोठ्या संख्येत बाहेर येऊन मतदानाचे आवाहन केले.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मध्य दिल्लीच्या निर्माण भवनस्थित मतदान केंद्रावर सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी मतदान केले. तर या पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी औरंगजेब लेनस्थित मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचले होते.
‘जनतेची इच्छा असेल तेच होईल’, असे सोनिया गांधी यांनी त्यांना निवडणुकीबाबत विचारले असता सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)