बाबो! आई प्रियंका चोप्रा तर वडिलांचं नाव सनी देओल; 12 वीची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 07:49 PM2021-10-23T19:49:21+5:302021-10-23T19:53:39+5:30
12th exam shocking viral photo : विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली - प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अभ्यास, परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. पण कित्येकदा अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी केली जाते किंवा मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीही लिहिलं जातं. काही विद्यार्थी उत्तर लिहिण्याऐवजी चित्रपटातील गाणी अथवा डायलॉग लिहितात. तर काही जण वाटेल ते लिहितात. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका उत्तरपत्रिकेचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. शिक्षक कोमात आणि विद्यार्थी जोमात असंच म्हणावं लागेल. बिहारच्या बेतियामध्ये राम लखन सिंह यादव कॉलेजमध्ये सुरू असलेल्या 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अजबच उत्तर लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याने तर उत्तर पत्रिकेत आपल्या आईच्या नावाच्या जागी प्रियंका चोप्राचं नाव लिहिलं आहे. तर वडिलांचं नाव सनी देओल लिहिलं आहे.
दुसऱ्या एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत प्रेमात 'बेवफा' झाल्याबद्दल लिहिलं आहे. राम लखन सिंह यादव महाविद्यालयाच्या उत्तर पत्रिकेवर अभिनेता, अभिनेत्रींची नावे पाहिल्यावर तर अनेकांना धक्काच बसला. त्यावर रोल नंबर नाही आणि प्रश्नांच्या उत्तरांच्या रखाण्यात काहीही विचित्र गोष्टी लिहिल्या आहेत. व्हायरल कॉपीमध्ये विद्यार्थ्याचं नाव आदित्य कुमार, रोल नं-170, वर्ग- 12 लिहिण्याबरोबरच एका तरुणीचं नाव लिहिण्याबरोबरच आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. व्हायरल होत असलेल्या उत्तर पत्रिकेत पुरातत्वबदद्ल प्रश्न विचारला होता, त्याखाली विद्यार्थ्यांनी लिहिलं की, आम्हाला शिक्षकांनी त्याबद्दल शिकवलं नाही.
विद्यार्थ्याने मोहनजोदडोच्या विशाल स्नानागारच्या वर्णनाबद्दल लिहिलं आहे की, राजाची पत्नी तेथे नाचत असे आणि कपडे चोरी करीत होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी भाखडा नागल डॅमबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. विद्यार्थ्याने आपल्या उत्तरामध्ये धरण सतलज नदीवर बांधलं आहे. पुढे तो सरदार पटेल, टाटा-बाय बाय, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाची शेती, चीन, लंडन, जर्मनी आणि विश्वयुद्धापर्यंत पोहोचतो आणि शेवटी फिरून तो विद्यार्थी पुन्हा पंजाब, सतलज नदी आणि धरणावर पोहोचतो. या उत्तरपत्रिकेवर दहापैकी शून्य गुण देण्यात आले होते.